1. शिक्षण

पेरा- सीईटी पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी 12 जुलै पर्यंत मुदतवाढ

प्रीमिनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन म्हणजेच पेरा इंडिया या राज्यातील 14 खाजगी विद्यापीठाच्या संघटनेने 2021-22 या शैक्षणिक सत्राच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 12 जुलै 2021 पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
pera exam

pera exam

 प्रीमिनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन म्हणजेच पेरा इंडिया या राज्यातील 14 खाजगी विद्यापीठाच्या संघटनेने 2021-22 या शैक्षणिक सत्राच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 12 जुलै 2021  पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

 आता ही परीक्षा 16, 17 आणि 18 जुलै दरम्यान ऑनलाइन माध्यमांद्वारे होणार आहे, अशी माहिती पेराच्या अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली. यावेळी डॉ. कराड म्हणाले की, खाजगी विद्यापीठांमधील इंजीनियरिंग, बायो इंजीनियरिंग, मरीन इंजीनियरिंग, डिझाईन, फाइन आर्ट्स, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल मॅनेजमेंट यासारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही सीईटी घेण्यात येत आहे. यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी  www.peraindia.in या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.

 या सीईटी द्वारे कोणत्या विद्यापीठात  मिळू शकतो प्रवेश?

  • एम आय टी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे
  • विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
  • डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे
  • सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे
  • डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे
  • स्पायसर ॲडवेंटिस्ट युनिव्हर्सिटी,  पुणे
  • संदीप विद्यापीठ नाशिक
  • संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर

 

  • एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद
  • एमआयटी डब्ल्यूपीयु युनिव्हर्सिटी पुणे
  • डी. वाय. पाटील विद्यापीठ, अँबी पुणे
  • विजय भुमी यूनिवर्सिटी मुंबई
  • सोमय्या विद्यापीठ मुंबई
  • डी. वाय. पाटील एग्रीकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रवेश घेता येईल.

 

संदर्भ – दिव्य  मराठी

English Summary: pera cet pre exam Published on: 11 July 2021, 04:09 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters