Education

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यातआणखी भर पडणार नाही, याची दक्षता शालेय शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्यामुळे दहावी- बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच आणि ऑफलाईनच होईल,अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने दिली.

Updated on 03 February, 2022 6:20 PM IST

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यातआणखी भर पडणार नाही, याची दक्षता शालेयशिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्यामुळे दहावी- बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच आणि ऑफलाईनच होईल,अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने दिली.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावी-बारावीची पटसंख्या 15 असलेल्या ठिकाणी एक स्वतंत्र परीक्षा केंद्र असेल,असेही बोर्डाने स्पष्ट केलं.

दहावी-बारावी साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. दीडशेहून अधिक विषयांची आठ माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा अडथळा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतील. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेतला जाणार आहेत.कोरोनाचा संसर्ग वाढेल,अशी शक्यता वर्तविला ने परीक्षा 4 मार्च नंतर घेण्याचे नियोजन होते. परंतु, मुंबईसह इतर जिल्ह्यांमधील कोणाचा संसर्ग आता कमी झाल्याने परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी  भूमिका शालेय शिक्षण विभागाची आहे.

परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन त्यांच्यापुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल, निकालास विलंब होऊ शकतो, अशी कारणे बोर्डाने सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनचपरीक्षांचे नियोजनकेल्याचीही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. बहुतेक शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून 15-20 दिवसात उर्वरित अभ्यासक्रम 100%शिकून पूर्ण होईल. विद्यार्थ्यांनी ‘हिंदुस्तानी भाई’ सारख्या व्यक्तींवर विश्वास न ठेवता परीक्षेची तयारी करावी,असे आवाहन ही बोर्डाने केले आहे.बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीमंगळवारी शालेय शिक्षण मंत्र्यांची चर्चा केल्याचीही सूत्रांनी सांगितले.

 परीक्षेसाठी 31 हजार केंद्रे

 राज्यातील जवळपास 32 लाख विद्यार्थी दहावी- बारावीची परीक्षा देणार आहेत. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला,तरीही धोका टळलेला नाही. त्यामुळे पंधरा पटसंख्या असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असणार आहे.

इतर वेळी परीक्षांची राज्यभरात आठ हजार केंद्रे आहेत. परंतु कोरोनामुळे राज्यातील एकतीस हजार केंद्रांवर ( शाळा तेथे परीक्षा केंद्र ) विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन केले जात आहे.

 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांची सुरक्षितता व गुणवत्त,यास प्राधान्य देऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे.”

English Summary: one examination center for 15 student and management and ssc exam held on exact date
Published on: 03 February 2022, 06:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)