1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची घोषणा त्यांनी केली.
2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये देशातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार डिजिटल विद्यापीठे स्थापन करणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.विद्यापीठISTE दर्जाची असणार आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन शिक्षण घेणे सोपे होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध प्रकारच्या प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण घेणे सुलभ होणार असून त्यासाठी मोठी विद्यापीठे आणि संस्था मदत करतील.
अर्थसंकल्पात डिजिटल शिक्षणावर भर
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, कोरोणा काळामध्ये शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई म्हणून येणाऱ्या काळात डिजिटल शिक्षणावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यासोबतच प्रधानमंत्री ईविद्या योजनेच्या माध्यमातूनवनचॅनल वन क्लास योजना 12 वरून 200 टीव्ही चॅनल करण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या वर्गांसाठी दर्जेदार शिक्षणाची सोय केली जाणार आहे. त्यासोबतच टीव्ही, मोबाईल आणि रेल्वेच्या माध्यमातून देखील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण दिले जाणार आहे.
याशिवाय शहरी विकासाचे नवे अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी पाच संस्थांना सेंटर फॉर एक्सलन्स करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक संस्थेला दोनशे पन्नास कोटींचा निधी मिळेल. त्यासोबतच विकासासाठी आणि संशोधनाला चालना देण्यासाठी या संस्थांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
Published on: 02 February 2022, 08:50 IST