मुंबई- शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कृषी शिक्षणाबद्दल ओढ, संशोधनाला चालना आणि सर्वोत्तम बुद्धिमत्ता कृषी क्षेत्राकडे आकर्षित करणे हा कृषी शिक्षणाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यामागील उद्देश असल्याचे राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेची चक्रे गतिमान करण्यात कृषी क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. कष्टाच्या जोरावर सोनं पिकविण्याची क्षमता असलेल्या मातीतून करिअरच्या उज्ज्वल वाटा निर्माण होऊ शकतात. इंजिनिअरिंग, वैद्यकीय क्षेत्र,आयटी इ. क्षेत्रांसोबत कृषी क्षेत्रात करिअरच्या अमाप संधी आहेत. कृषी क्षेत्रातील नव्या वाटेबद्दल विस्तृत माहिती देणाऱ्या लेखमालिकेतून जाणून घेऊया ‘कृषी पदवीधर’ विषयी:
कृषी उद्योगासाठी प्रशिक्षित तरुणांची आता मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. देशात ५३ कृषी विद्यापीठे, पाच अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय कृषी विद्यापीठ आणि चार केंद्रीय विद्यापीठे कार्यरत आहेत. या सर्व संस्थामधून उत्तम दर्जाचे विद्यार्थी शिक्षण घेउन बाहेर पडत आहेत. परदेशातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन, संशोधन आदी शाखांमध्ये कार्य होत आहे. इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात करिअर करता येवू शकते
कृषी पदवीधर
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि त्यांना समकक्ष महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण दिले जाते. या क्षेत्रात पदवी संपादन करण्यासाठी शास्त्र शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे ही प्राथमिक अट आहे. राज्यातील कृषी विषयातील उपलब्ध अभ्यासक्रमात कृषी, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, वनिकी, पशुसंवर्धन हे घटक समाविष्ट आहेत.
अभ्यासक्रमासाठी प्रवेश कुठे घ्याल?
महाराष्ट्रातील खालील प्रमुख चार कृषी विद्यापीठ आणि त्यांच्या समकक्ष महाविद्यालयात कृषी पदवीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. चारही कृषी विद्यापीठे कृषी संशोधन व विकासासाठी शैक्षणिक वर्तृळात ख्यातकीर्त आहेत. राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीय पद्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची सविस्तर उपलब्ध आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
अभ्यासक्रम कालावधी: चार वर्षे
प्रवेश पात्रता : बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक
करिअरच्या संधी:
कृषी पदवीधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत पदवी-पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये व्याख्याता, शिक्षक
कृषी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ
राष्ट्रीय संशोधन केंद्रांवर शास्त्रज्ञ
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कृषी अधिकारी, ग्रामसेवक या पदांवर काम करण्याच्या संधी या पदवीधारकांना उपलब्ध आहेत.
.कृषी पदवीधर विविध उद्योग स्थापन करू शकतात.
Published on: 01 September 2021, 01:08 IST