Education

शनिवारी राज्यात सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 सुरळीतपणे पार पडली.

Updated on 28 February, 2022 11:36 AM IST

 शनिवारी राज्यात सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 सुरळीतपणे पार पडली.

आयोगाच्या सर्व स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ऍक्शन मोडवर काम करीत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले. शनिवारी पार पडलेल्या या परीक्षेत महाराष्ट्रात एकूण 37 जिल्हा केंद्रांवरील 1098 उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे दरम्यान पुण्यामधील एस एन डी टी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्र व इतर परीक्षा केंद्रांवर निंबाळकर यांनी अचानक भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी आसन व्यवस्था आणि परीक्षार्थी उमेदवारांना पुरवण्यात आलेल्या सुविधांविषयी माहिती घेतली या परीक्षेसाठी राज्यभरातून शनिवारी 1098 परीक्षा केंद्रांवर 3 लाख 62 हजार 319  उमेदवार बसले होते. शासनाकडून प्राप्त झालेल्या रिक्त पदांच्या मागणी पत्रावर आयोगाने जलद कार्यवाही सुरू केली असून विविध भरतीच्या जाहिराती देखील प्रसिद्ध होऊ लागले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध पदांच्या मुलाखती घेऊन त्यांचा निकाल व गुणवत्ता यादी त्या दिवशी जाहीर झाली. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर स्वतः नागपूर, अमरावती नाशिक, पुणे व मुंबई येथे आयोजित मुलाखत सत्रांना  उपस्थित राहून भरती व निकाल प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

English Summary: mpsc commision now action mode for take fast examination of empty vacincy
Published on: 28 February 2022, 11:36 IST