सध्या संपूर्ण जगभरात महागाई वाढली आहे, याचबरोबर बेरोजगारी सुद्धा वाढली आहे. कोरोनाच्या महामारी मध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सध्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञान मध्ये जॉब च्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. परंतु आर्थिक महामंदी मुळे त्याला सुद्धा स्थगिती मिळाली असल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत.
सध्या भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. भारतातील अन्नधान्याच्या किरकोळ बाजाराची उलाढाल की करोडो रुपयांची होते. सध्या भारत देश जगात भाजीपाला आणि फळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगात लाखो रोजगार उपलब्ध होत आहेत.
लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयी मध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत लोकांना प्रक्रिया केलेले पदार्थ अधिक रुचकर लागतात शिवाय प्रक्रिया केलेल्या वस्तू कडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. आजकालचे युग हे फास्ट फूड चे युग आहे त्यामुळं जीवनावश्यक वस्तू तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रकिया करून जास्त दिवस टीकवल्या जातात.
हेही वाचा:-भारतात लवकरच लॉन्च होणार मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
अन्नप्रक्रिया व्यवसायात करियर च्या संधी :-
1) जर तुम्हाला अन्नप्रक्रिया व्यवसायात काम करायचं असेल तर बारावी नंतर बीटेक अन्नतंत्रज्ञान हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम हा कृषी विद्यापीठांतर्गत चालवला जातो. या प्रवेशाची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होते. या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बारावी सायन्स बरोबर सी ई टी विषयात पास होणे गरजेचे आहे. तसेच बारावी विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे विषय असणे गरजेचे आहे.
2)देशात फळप्रक्रिया उद्योग क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. याचबरोबरीने कृषी कार्यालय, अन्नसुरक्षा अधिकारी तसेच फूड कॉर्पोरेशन इंडियामध्ये आआपल्याला नोकरी करता येते.
हेही वाचा:-Kawasaki ने भारतात लाँच केली सर्वात स्वस्त रेट्रो बाईक, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
3) तसेच फूड प्रोसेसिंग मध्ये बाहेरच्या देशात जाऊन काम करण्याची संधी मिळू शकते तसेच उच्च पगाराच्या ऑफर सुद्धा मिळू शकतात.
4)मॉल्स, हॉस्पिटल, हॉटेल्स, जीममध्ये क्वालिटी कंट्रोलर तसेच डाएटेशियन तसेच वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षक, प्रशिक्षक म्हणून संधी मिळू शकते.
5) तसेच डिग्री चे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही समंधित व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता या साठी शासन तुम्हाला अनुदान देऊन मदत सुद्धा करेल.
6) तसेच या फील्ड मध्ये तुम्ही उच्च शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ तसेच कृषी विद्यापीठ यामध्ये प्रोफेसर सुद्धा होऊ शकता.
Published on: 09 October 2022, 11:10 IST