Education

गेल्यावर्षी उच्च शिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा घातलेला गोंधळ अजूनही मिटला नसल्याचे दिसत आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याची सूचना भारतीय विधिज्ञ परिषदेने दिलेली सूचना कायम ठेवली असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदवी बाबत पेच निर्माण झाला आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पदवी देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

Updated on 21 June, 2021 7:00 AM IST

 गेल्यावर्षी  उच्च शिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा घातलेला गोंधळ अजूनही मिटला  नसल्याचे दिसत आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याची सूचना भारतीय विधिज्ञ परिषदेने दिलेली सूचना कायम ठेवली असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदवी बाबत  पेच निर्माण झाला आहे.

 राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पदवी देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

 राज्याचा निर्णय आणि विधिज्ञ परिषदेचे सूचना यामुळे यंदा पदवीपर्यंतच्या टप्पा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पेच निर्माण झाला आहे विधी अभ्यासक्रमांचे नियमन भारतीय विधिज्ञ परिषद करते. मागच्या वर्षी इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या स्वायत्त प्राधिकरणप्रमाणेच परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देण्यास परिषदेने विरोध केला होता. परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पुढील वर्गातढकलू नये,अशा आशयाच्या सूचना मागच्या वर्षी परिषदेने दिल्या होत्या. या निर्णयाविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती.

 त्याचप्रमाणे याबाबत स्पष्टीकरण करण्याची विनंती परिषदेला केली होती. परिषदेनिमित्त प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात ही परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आता परीक्षा न देता अंतिम वर्षाला प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांबाबत पेच निर्माण झाला आहे.

 मागच्या वर्षी काय घडले होते?

 मागच्या वर्षी ते वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत. इतर  अभ्यासक्रमानुसार अनेक ठिकाणी विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आदल्या वर्षाच्या सरासरी गुणांनुसार पुढील वर्षात प्रवेश देण्यात आला. यंदा या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे.

मात्र विधी परिषदेच्या नियमानुसार सर्व परीक्षा घेणे आवश्यक आहे.  तसेच परीक्षा घेण्यात याव्यात असेही परिषदेने गेल्यावर्षी आणि नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे यंदा विधी अभ्यासक्रमाची पदवी घेण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत पेच निर्माण झाला आहे.

English Summary: law college
Published on: 21 June 2021, 07:00 IST