मुंबई: राज्य सरकारने भरतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये राज्यात जम्बो मेगाभरती होणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर सरकारने हा प्लान तयार केला आहे.
गृहविभागातील 7 हजार पदांवरही 15 सप्टेंबरपासून भरती सुरु होणार आहे. पोलीस पदभरती - 7231, एमपीएससीमार्फत भरती 11,026, गट ‘ब, क व ड’ची पदभरती 60,000 होणार आहे. या भरतीला 15 सप्टेंबरनंतर सुरुवात होणार आहे. तर डिसेंबरनंतर 25 ते 50 हजार पदभरतीचा दुसरा टप्पा होणार आहे.
या शुभ मुहूर्तावर करा लाडक्या बाप्पाची स्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी
राज्यात सव्वादोन लाख पदे रिक्त
राज्य सरकारच्या एकूण 29 प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 100 टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे. डिसेंबरनंतर 25 ते 50 हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.
आता महावितरण ठेवणार नजर; नुकसान भरून काढण्यासाठी राबविली जाणार 'ही' मोहीम
या विभागातील पदांसाठी भरती होणार
राज्य सरकारकडून मेगाभरतीचे युध्दपातळीवर नियोजन सुरु आहे. कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास या विभागातील पदांसाठी भरती होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास मिळणार 20 लाख रुपये
खरीप पिकांमध्ये आंतरमशागतीचे नियोजन करा तंत्र पद्धतीने; चांगल्या उत्पादनासाठी होणार मदत
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवून 25 लाखांचे मालक व्हा; एलआयसीची 'जीवन आनंद योजना' देत आहे संधी
Published on: 30 August 2022, 02:22 IST