Education

सध्या कोरोना परिस्थितीमधून सगळे जण सावरत असताना बऱ्याच प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती देखील झळकू लागले आहेत. कारण मागील दोन वर्षापासून सगळ्या प्रकारच्या भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या.

Updated on 12 March, 2022 1:16 PM IST

सध्या कोरोना परिस्थितीमधून सगळे जण सावरत असताना बऱ्याच प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती देखील झळकू लागले आहेत. कारण मागील दोन वर्षापासून  सगळ्या प्रकारच्या भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या.

किंबहुना आपल्याला माहित आहेच की कोरोना परिस्थितीमुळे अनेक जणांच्या नोकरी देखील हातचा गेल्या.अनेक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.परंतु आता परिस्थिती हळूहळू सुधारत असून नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अशीच एक भरतीचे अधिसूचना सध्या जारी करण्यात आली असून दहावी पास उमेदवारांसाठी यामध्ये मोठी संधी आहे. भारतीय पोस्ट खात्यामध्ये दहावी परीक्षा पास असलेल्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची खास संधी चालून आली आहे.या भरतीबद्दल या लेखात माहिती घेऊ.

भारतीय पोस्ट खात्यात नोकरीची संधी

 दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी पोस्ट विभागात दिल्लीनेमेल मोटर सेवा विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पोस्ट विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या एकूण 29 रिक्त जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.जे उमेदवार यासाठीइच्छुक व पात्र असतील अशी उमेदवार इंडिया पोस्ट च्या अधिकृत संकेतस्थळ indiapost.gov.inयावर अधिक माहिती घेऊ शकतात.

 एकूण पदे आणि आरक्षणनिहाय विभागणी

  • अनारक्षित म्हणजे जनरलसाठी पंधरा पदे
  • एस सी कॅटेगरी साठी तीन पदे
  • ओबीसी कॅटेगरी साठी आठ पदे
  • ईडब्ल्यूएस साठी तीन पदे
  • अशी एकूण 29 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

 या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांकडे हलके किंवा जड मोटारवाहन म्हणजेच हेवी मोटर वेहिकल चालवण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.
  • तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबतच कमीत कमी तीन वर्षाचा ड्रायव्हिंग चा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • सोबतच उमेदवाराला मोटर मेकॅनिझमचे जुजबी ज्ञान असले पाहिजे.

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 मार्च आहे.

 उमेदवाराचे वय मर्यादा

 इच्छुक व पात्र उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 ते जास्त 27 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे.

निवड झाल्यानंतर मिळणारे वेतन

 ज्या उमेदवारांची या मधील निवड होईल अशांना 19900 ते 63 हजार दोनशे ( स्तर 2) इतके वेतन देण्यात येईल.

 निवड प्रक्रिया

 उमेदवारांची निवड प्रक्रिया अनुभवावर आणि स्किल टेस्टच्या आधारावर  होणार आहे.

English Summary: job oppurtunity for tenth pass student in indian post office for driver post
Published on: 12 March 2022, 01:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)