शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनांतर्गत उपलब्ध असलेल्या जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच खाजगी आयटीआय मधून शिल्प कारागिरी या प्रशिक्षण योजनेअंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येतो.
या योजनेच्या माध्यमातून 28 हजार आठशे रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्ष 2019 मध्य प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
ज्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के, तसेच अडीच लाख ते आठ लाख रुपयांदरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 80 टक्के रकमेच्या का शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. या संबंधित विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या प्रशिक्षण संस्थांमधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण शुल्क इतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कम विद्यार्थ्यां प्रतिपूर्ती केली जाते. त्यामुळे या योजनेतून विविध अभ्यासक्रमानुसार 19200 ते 28 हजार 900 रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळते असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
तसेच राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागीर, कामगार इत्यादी घटकांना आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केले जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील कारागीर, कामगार अधिक कुशल घटकांना याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा
या योजनेद्वारे लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 मार्च 2021 पासून ऑनलाईन हात भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.https:/mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे मंत्र मलिक यांनी सांगितले.
Published on: 17 March 2021, 08:35 IST