अनेक तरुण विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करतात. बऱ्याच दिवसापासून राज्यात आणि देशात भरतीच्या प्रक्रिया बंद असल्यामुळे अनेक तरुण चातकासारखे भरतीची वाट पाहत होते. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून भारतीय पोस्ट विभागाकडून जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. संपूर्ण देशातील 23 मंडळांमध्ये ही भरती केली जाणार असून याचा फायदा जवळजवळ एक लाख बेरोजगार तरुणांना मिळू शकणार आहे.
नक्की वाचा:PNB बँकेत या पदांसाठी बंपर भरती! पदवी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया
भारतातील एकूण पदनिहाय जागा
1- पोस्टमन- 59 हजार 99 जागा
2- मेल गार्ड- एकूण 1445 जागा
3- मल्टिटास्किंग पोस्ट- एकूण 37 हजार 539 जागा
महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागा
1- पोस्टमन- नऊ हजार 884 जागा
2- मेल गार्ड- 147 जागा
3- मल्टिटास्किंग पोस्ट- पाच हजार 478 जागा
या भरतीसाठी आवश्यक पात्रता
उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असेल ते उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.
यामधील काही पदांसाठी उमेदवारांनी इयत्ता बारावी पूर्ण केलेली असावी तसेच मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा
टपाल विभागाच्या निकषानुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे कमीत कमी वय 18 ते जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठीची वेबसाईट
indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वरील मुख्य पृष्ठावरील भरती या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
Published on: 17 August 2022, 12:11 IST