Education

देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मधून नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक खूषखबर समोर येत आहे. जर कोणी इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याच्या विचारात असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण की आयओसीएल अर्थात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.

Updated on 16 March, 2022 1:08 PM IST

देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मधून नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक खूषखबर समोर येत आहे.

जर कोणी इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याच्या विचारात असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण की आयओसीएल अर्थात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.

नौकरीची बातमी:-काय सांगता! ST मध्ये 10 हजार पदांची भरती; जाणून घ्या याविषयी

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या कंपनीने इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी ऑनलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे ज्या पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या www.iocrefrecruit.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कारण की, अर्ज मागविण्याची शेवटची तारीख 29 मार्च ही ठेवली गेली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया 8 मार्च पासून चालू झाली आहे.

महत्वाची बातमी:- आनंदाची बातमी! 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी 'या' ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या याविषयी

या जाहिराती विषयी अल्पशी माहिती

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 29 मार्च 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • पदाचे नाव:- केमिकल डिसिप्लिनमध्ये ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट - IV (प्रोडक्शन) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून एकूण चार पदे भरली जाणार आहेत.
  • सदर पदासाठी शैक्षणिक अहर्ता:- ईच्छुक उमेदवारांकडे केमिकल/रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मधील तीन वर्षांची पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह (आरक्षित प्रवर्गांसाठी 45 टक्के) बीएससीची पदवी असणे अनिवार्य राहणार आहे.
  • पदासाठी निवड प्रक्रिया कशी असेल:- हाती आलेल्या माहितीनुसार या पदासाठी सर्वप्रथम लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहेत त्यानंतर या पदासाठी स्कील/प्रोफिशिएन्सी/फिजीकल टेस्ट घेतले जाईल व त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार असल्याचे सांगितले जातं आहे.
  • काय असेल पगार:- मित्रांनो या पदासाठी 25 हजार ते 1 लाख 5 हजार मासिक पगार मिळणार आहे.

हेही वाचा:-Small Business: शेणाच्या गोवऱ्या विकून देखील करता येऊ शकते लाखोंची कमाई; 300 रुपये किलो मिळतोय दर

English Summary: indian oil vacancy 1 lakh rupees month will be paying company learn more about it
Published on: 16 March 2022, 01:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)