Education

भारत सरकारने विद्यार्थ्यांसाठी देखील एक शिष्यवृत्ती कार्यक्रम जारी केला असून 'पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवार्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया' अर्ज मागविले असून जे विद्यार्थी यासाठी इच्छुक असतील असे विद्यार्थी या योजनेसाठी nta.ac.in वर अर्ज करू शकतात. जे विद्यार्थी इच्छुक असतील ते यामध्ये 26 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करू शकतात. यासाठी ऑनलाईन अर्जासाठी दुरुस्ती विंडो 27 ऑगस्ट 31 ऑगस्ट दरम्यान खुली असेल.

Updated on 05 August, 2022 6:45 PM IST

 भारत सरकारने विद्यार्थ्यांसाठी देखील एक शिष्यवृत्ती कार्यक्रम जारी केला असून 'पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवार्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया' अर्ज मागविले असून जे विद्यार्थी यासाठी इच्छुक असतील असे विद्यार्थी या योजनेसाठी nta.ac.in वर अर्ज करू शकतात. जे विद्यार्थी इच्छुक असतील ते यामध्ये 26 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करू शकतात. यासाठी ऑनलाईन अर्जासाठी दुरुस्ती विंडो 27 ऑगस्ट 31 ऑगस्ट दरम्यान खुली असेल.

यामध्ये महत्त्वाचे असे की अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पैसे आकारले जाणार नाहीत. ज्या उमेदवारांनी  एनटीए सादर केला आहे त्या उमेदवारांचे 5 सप्टेंबर 2012 रोजी अधिकृत वेबसाईटवर प्रवेश पत्र जारी करतील.

 या स्कॉलरशिपसाठी अर्जासाठी पात्रता

1- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी यासाठी पात्र राहतील तसेच अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल.

2- हे शिष्यवृत्ती ओबीसी, गैर अधिसूचित श्रेणीतील इयत्ता नववी ते बारावीच्या पंधरा हजार शालेय विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

3- या योजनेअंतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 75 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार असून इयत्ता अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजार रुपये दिले जातील.

नक्की वाचा:ऑस्ट्रेलियन कृषी क्षेत्राची होईल ओळख! राहुरी कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियातील 'मरडॉक विद्यापीठा'सोबत सामंजस्य करार

या शिष्यवृत्ती पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

1- यासाठी सर्वप्रथम या योजनेची अधिकृत वेबसाईट yet.nta.ac.in वर जावे लागेल.

2-त्यानंतर तुम्हाला नोंदणी किंवा लॉगिन लींक वर क्लिक करावे लागेल.

3- त्यानंतर तुम्हाला सगळ्या आवश्यक पर्सनल डिटेल्स भरावी लागेल.

4- हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व तुमची स्वाक्षरी इत्यादी अपलोड करावी.

5- त्यानंतर अर्ज सबमिट करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर तो डाऊनलोड करून ठेवा कारण भविष्यातील संदर्भासाठी ते महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:Rule Change! सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार 'या' मुलींना देखील लाभ,वाचा नियमातील बदल

पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवार्ड  स्कीम एक्झाम

 या योजनेसाठी पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवार्ड स्कीम परीक्षा 11 सप्टेंबर रोजी होणार असून ही परीक्षा तीन तासांची असेल. या परीक्षेमध्ये संगणकाधारित चाचणी घेतली जाणार असून MCQ प्रश्न विचारले जातील. संपूर्ण देशातील 78 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून हिंदी आणि इंग्रजी मध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत.

MSJ&E द्वारे अधिकृत असलेल्या शाळांमध्ये शिकण्यासाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावी मध्ये शिकत असलेल्या ओबीसी,इबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील उमेदवारांच्या निवडीसाठी यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

यासाठी एनटीएने यशस्वी 2022 अभ्यासक्रमदेखील जारी केला असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात.

नक्की वाचा:Health Insurence:दरवर्षी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा हवा असेल तर बनवा 'हे' कार्ड,वाचा संपूर्ण तपशिलावर माहिती

English Summary: indian goverment give scholarship to 9 to 12 standard student
Published on: 05 August 2022, 06:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)