Education

संपूर्ण महााष्ट्रात दि.३०/५/२२ ते दि.५/६/२२ या कालावधीत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे.

Updated on 07 June, 2022 9:07 PM IST

संपूर्ण महााष्ट्रात दि.३०/५/२२ ते दि.५/६/२२ या कालावधीत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे .

या अनुषंगाने कृषी महाविद्यालय, अकोला येथील रा. से.यो. कडून संपूर्ण अकोला शहरामध्ये विविध गर्दी च्या ठिकाणी पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह राबवला जात आहे.

 या मोहिमेचे उद्घाटन डॉ.एस.एस माने सर (सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला) यांनी केले . त्यांनी पर्यावरण संरक्षणाबद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. लांबे सर (प्रमुख विस्‍तार शिक्षण विभाग) 

डॉ. खाडे सर, (प्रमुख कार्यक्रम अधिकारी) डॉ. जेउघाले सर(प्रमुख शिक्षण विभाग) डॉ. ठाकूर, डॉ.गीते, डॉ. मारावर , डॉ काहते , डॉ दलाल, डॉ. दिवेकर, डॉ शेळके, डॉ. खांबलकर, डॉ. झोपे, डॉ. भगत, डॉ जोशी, डॉ. वराडे यांची यांची उपस्थिती लाभली.

या मोहिमेच्या प्रथम दिवशी विद्यापीठ परिसरात रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसर, क्रीडांगण, वसतिगृह परिसर,कमिटी हॉल , बगीचा व इतर परिसराची स्वच्छता व वृक्षारोपण करून श्रमदान केले. व सोबत जनतेमध्ये पर्यावरण जनजागृती 

बद्दल "पृथ्वी एकच आहे " या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. जनतेमध्ये निसर्गाचे महत्त्व ,स्वच्छतेचे महत्त्व, घनकचरा व्यवस्थापन, निसर्गामध्ये वृक्षांचे महत्व व ईतर विषयावर जनजागृती केली. 

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी मार्गदर्शन केले. व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक 

कन्हैया गावंडे, स्वस्तिक, प्रधान करिष्मा, रजूभाई, श्रुती नीचट, मयुरी खांबलकर, ऐश्वर्या कोरडे, आयुशी झोडे, अदिती हींगणकर,अनिकेत हरके ,सोनाली डोये, विशाल काळे, वैभव आढाऊ , मनाली धवसे, सेजल वाळशिंगे, अक्षय माकने, पुनम अवचार, सागर अवचार, कोमल शिवणकर, हिमांशू डोंगरे, मोहम्मद उमेद , बादल बावणे, अनिकेत हरके ,योगेश उगले, आदेश घोडके, श्रावणी पोफळी, विकास पायघान , गोपाल ताठे, सौरभ दांजुळे हर्षवर्धन गवळी, सूरज जाधव , ज्ञानेश मुंडे, रीतिक महाजन व ईतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: In college of agriculture Akola environmental awareness and cleanness 7 days program start program
Published on: 07 June 2022, 09:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)