Education

भूमिअभिलेख विभागातील गट क पद्धत समूह( भूकरमापक तथा लिपिक ) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहित अहर्ता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in

Updated on 17 February, 2022 2:52 PM IST

भूमिअभिलेख विभागातील गट क पद्धत समूह( भूकरमापक तथा लिपिक ) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहित अहर्ता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in

https://mahabhumi.gov.inया वेबसाईटवर दिनांक 9 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यानुसार 31 डिसेंबर या दिवशी अंतिम मुदत असताना जवळजवळ 76 हजार 379 अर्जांचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे.परंतु जेव्हा या अर्जांची छाननी करण्यात आली तेव्हा बरेच उमेदवार शैक्षणिक अहर्ता धारण करीत नसून देखील अर्ज भरल्याचे दिसून आले. त्यासोबतच होणाऱ्या या भरतीसाठी एका विभागासाठी फक्त एकच अर्ज भरणे आवश्यक असताना बऱ्याच उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे आढळले. तसेच बऱ्याच उमेदवारांनी त्यांचा फोटो आणि सही देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.

या कारणांमुळे भूमी अभिलेख विभागाने ऑनलाइन अर्ज स्वीकृती द्वारे प्राप्त अर्ज मधून अहता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडण्यासाठी  छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे ठरवलेआहे. याबाबतची सविस्तर माहिती भूमी अभिलेख विभागाच्याhttps://mahabhumi.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. छाननी अर्ज हे केवळ 9 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांना भरता येतील.शैक्षणिक अहर्ता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करायचे आहे.

तसेच जे उमेदवार विविध शैक्षणिक अहर्ता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येऊन छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा  परतावा देखील करण्यात येणार आहे.(स्रोत-वेबदूनिया)

English Summary: imporatant information about land record department recruitment
Published on: 17 February 2022, 02:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)