Education

Sarkari Naukri :- सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत अनेक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत असून त्याचा खूप मोठा लाभ हा नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना होताना दिसून येत आहे. सध्या राज्य सरकारचा विचार केला तर तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून वनरक्षक पदासाठी देखील परीक्षा सध्या सुरू आहे. महाराष्ट्र मध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत देखील रिक्त पदांसाठी आता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

Updated on 10 August, 2023 10:02 AM IST

  Sarkari Naukri :- सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत अनेक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत असून त्याचा खूप मोठा लाभ हा नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना होताना दिसून येत आहे.

सध्या राज्य सरकारचा विचार केला तर तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून वनरक्षक पदासाठी देखील परीक्षा सध्या सुरू आहे. महाराष्ट्र मध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत देखील रिक्त पदांसाठी आता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

याच अनुषंगाने जर आपण बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांच्या करीता देखील स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. आता स्टाफ सिलेक्शन आयोगाकडून देखील परीक्षेचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून या परीक्षेमध्ये बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी मिळणार आहे.

 स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत होणार भरती

 याबद्दल सविस्तर वृत्त असे की, स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससीने बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी दिली असून या आयोगामार्फत परीक्षेचे नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोन ऑगस्ट रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून स्टेनोग्राफर या पदासाठी भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 या परीक्षेसाठी असलेले निकष

 स्टाफ सिलेक्शन मार्फत घेण्यात येणारी स्टेनोग्राफर या पदासाठी ची परीक्षा ही दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील परीक्षा ही संगणकावर आधारित परीक्षेचा असणार असून दुसऱ्या टप्प्यात कौशल्य चाचणी अर्थात स्किल टेस्ट घेण्यात येणार आहे.

 किती मिळेल वेतन?

1- स्टेनोग्राफर ग्रुप सी- याकरिता बेस स्केल हे 9300 ते 34 हजार 80

2- पे बँड- चार हजार दोनशे किंवा चार हजार सहाशे( वेतन ग्रेड 2 )

3- सुरुवातीचा पगार- पाच हजार दोनशे रुपये आणि बेसिक पे हे 14500 असणार आहे.

 या दरम्यान होईल पहिल्या टप्प्याची परीक्षा

 स्टेनोग्राफर या पदासाठीची पहिल्या टप्प्याची परीक्षा ही 12 ते 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या परीक्षेकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत

 या परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही 23 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे.

 या संकेतस्थळावर करता येईल अर्ज

 जर तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला https://ssc.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.

English Summary: If you are 12th pass then there is government job opportunity here read information
Published on: 10 August 2023, 10:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)