राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या निकाला च्या बाबतीतला पेच सोडताना निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील निर्णय आज शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला.
या नवीन मूल्यमापन पद्धती नुसार इयत्ता दहावीच्या गुणांचे 30% वेटेज, इयत्ता अकरावी च्या गुणांचे 30 टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे 40% वेटेज यावर बारावीचा निकाल दिला जाणार आहे.
या नवीन फार्मूला मध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दहावीमधील बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुणावरून मूल्यमापन केले जाईल. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे जे विद्यार्थी या निकालाबाबत असमाधानी असेल त्यांना कोरोना ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी सुधार योजने अंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
देशात मागील वर्षापासून कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशाच्या शिक्षण क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. या वर्षी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून मूल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केले.
Published on: 02 July 2021, 07:42 IST