Education

बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या नंतर निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर करावा याबाबत शिक्षण विभागातर्फे विविध पातळ्यांवर चर्चा केली जात असून, 11 वी चा निकाल व अंतर्गत मूल्यमापनाचे आधारावर बारावीची अंतिम निकाल जाहीर करावा. सीबीएससी चे सूत्र जसेच्या तसे अमलात आणण्याची आवश्यकता नाही.

Updated on 21 June, 2021 9:44 PM IST

 बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या नंतर निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर करावा याबाबत शिक्षण विभागातर्फे विविध पातळ्यांवर चर्चा केली जात असून, 11 वी चा निकाल व अंतर्गत मूल्यमापनाचे आधारावर बारावीची अंतिम निकाल जाहीर करावा. सीबीएससी चे सूत्र जसेच्या तसे अमलात आणण्याची आवश्यकता नाही.

. अशा आशयाच्या सूचना रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत मांडण्यात आल्या.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा यावर्षी कोरूना च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु या परीक्षा रद्द झाल्यानंतर निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा याबाबत प्रश्‍न निर्माण झाला होता.

सीबीएसई बोर्डाने दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गातील  गुणांच्या आधारे म्हणजेच  30:30:40 फॉर्मुलास स्वीकारून बारावी चा अंतिम निकाल जाहीर करण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंडळाने ही बारावीचा निकाल जाहीर करण्याबाबत शिक्षण विभागातील अधिकारी तसेच शिक्षण तज्ञ, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या बरोबर चर्चा केली.

 

 राज्यातील जवळजवळ 13 लाख 70 हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. बारावीचे मार्क च्या दारावर विद्यापीठ स्तरावरील पदवी अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. उर्वरित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेऊन त्यात प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे बारावीचा निकाल नेमका कोणत्या पद्धतीने प्रसिद्ध केला जाणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. या बैठकीत काही तज्ञांनी मत मांडले की दहावीला विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणसुद्धा बारावी निकालासाठी ग्राह्य धरावी अशी भूमिका मांडली तर काहींनी याला विरोध केला.

English Summary: hsc result
Published on: 21 June 2021, 09:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)