बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने सीबीएससी प्रमाणे 30:30:40 चा फार्मूला विचारात घेऊन निकाल जाहीर करण्याचे ठरवले. परंतु बारावीचा निकालासाठी अंतर्गत मूल्यमापन40% ग्राह्य धरले जाणार आहे.
परंतु विद्यार्थ्यांमध्ये बोर्डाची परीक्षा होणार म्हणून वर्षभर सराव चाचणी, सराव परीक्षा इत्यादींना गांभीर्याने घेतले नसल्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते की प्रॅक्टिकल एक्झाम या लेखी परीक्षेनंतर घ्याव्यात त्यामुळे बहुतांशी महाविद्यालयांचे अंतर्गत मूल्यमापन रखडले असण्याची शक्यता आहे.
अशीच परिस्थिती 11 वी च्या वर्गाची आहे. मागील वर्षी अकरावीच्या अंतिम परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि अंतिम निकालात प्रचंड तफावत असण्याची शक्यता असल्याचे शिक्षकआणि मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्यानंतर एक महिन्यांनी राज्य सरकारने 12 वी च्या निकालाची कार्यपद्धती जाहीर केले आहे. यानुसार दहावीतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांना तीस टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषय निहाय गुणांना 30 टक्के आणि बारावीत वर्षभरात करण्यात आलेल्या अंतर्गत मूल्यमापन ला 40 टक्के अशा पद्धतीने बारावीच्या निकालाचा फार्मूला तयार करण्यात आला आहे. बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन आला 40 टक्के महत्त्व दिले जाणार आहे परंतु विद्यार्थ्यांनी बोर्डामार्फत लेखी परीक्षा होणार म्हणून अंतर्गत मूल्यमापनला फारसा महत्त्व दिले नसल्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत बोलताना सुंदरबाई मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी म्हणाले की, ही कार्यपद्धती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या धर्तीवर तयार केली आहे. असे असतानाही कार्यपद्धतीबाबत निर्णय घेताना राज्य सरकारने उशीर केल्याने आत्ता उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय वरील ताण वाढून अनेक महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन झालेले नाही. त्यामुळे वेळेत निकाल लावताना अडचण येणार आहेत.
Published on: 04 July 2021, 01:18 IST