अतुल्य भारत मोहिमेने देशातील पर्यटन उद्योगाला एक नवी दिशा दिली असून भारतीय संस्कृती जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची विदेशी पर्यटकांची ओढ दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे.
भारतातील पर्यटन क्षेत्र आणि हॉटेल उद्योग झपाट्याने विस्तारत आहे. हॉटेल उद्योगाचा थेट संबंध पर्यटनाशी आहे. जेवढे पर्यटक देशात येथील, तेवढे हॉटेल उद्योगाला चालना मिळेल.
2020 मध्ये सुरू झालेल्या कोरोनामुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला फटका बसल्यानंतर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला पुन्हा एकदा वेग आला आहे. महामारी नंतर यांनी पुन्हा जोर धरला असून आगामी काळात या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असा एक विश्वास आहे.
जग पुन्हा रुळावर येत असून सर्व उद्योग धंदे पूर्णपणे पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. हॉस्पिटॅलिटी ग्लोबल मार्केट रिपोर्ट 2022 नुसार, जागतिक हॉस्पिटॅलिटी मार्केट 15.1 टक्क्याच्या चक्रवाढ वार्षिक वाट दराने 2022 मध्ये $3995287 बिलियन
वरून $ 4,548.42 बिलियन पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. हा मोठा वाढीचा दर म्हणजे प्रवासावर जागतिक निर्बंधांमुळे परत आलेला मोठा बाउन्स आहे. 2026 मध्ये 10.2 टक्क्यांच्या CAGR वर बाजार $ 6,71527अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
पर्यटकांच्या संख्येत वाढ
येणाऱ्या काळात या उद्योगाकडे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे. असा अंदाज आहे की 2027 पर्यंत 30 दशलक्षाहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येतील त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स या क्षेत्रात करिअरच्या संधी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या असतील.
नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या दोन्ही ठिकाणी यामुळे संधी
हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्लेसमेंट मुळे विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट कोर्स ची खूप आवड आहे.हा कोर्स केल्यानंतर नोकरी असो की स्वयंरोजगार,अशा दोन्ही पातळीवर यशाची नवीशिखरे पादाक्रांत करता येणे शक्य आहे.या क्षेत्राच्या विस्तारामुळे नोकऱ्यांची उपलब्धतही आता पूर्वीपेक्षा जास्त आहे.
नक्की वाचा:कमवा आणि शिका' अंतर्गत टाटा मोटर्स मध्ये सुवर्णसंधी! बारावी पास असाल तर करा संधीचे सोने
या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून 18 हजार ते 25 हजार पर्यंत प्रारंभिक पगार मिळतो. तुमच्या पद, तुमच्या कामाची पद्धत आणि तुमचा अनुभव यानुसार पगार ठरवला जातो व तो वाढतो.
तुम्ही केवळ भारतातच नाही तर अगदी विदेशात देखील नोकरी करू शकतात व त्यामुळे तुमचा पगार गुणात्मक रीतीने वाढतो.
जर तुम्ही आपल्या भारतामधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला तरी तुम्हाला आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर मिळू शकते. तुम्ही जगाला चांगल्या प्रकारे व्यक्त आणि जगा विषयी तुमचे समज परिपक्व होतेव त्यामुळे तुम्ही जगाकडे एक उत्तम व्यावसायिक संधी म्हणून पाहण्यास सुरुवात करतात.
Published on: 14 June 2022, 09:19 IST