Education

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील धारणी तालुक्यातील एका छोटाशा गावातील झेडपी शिक्षकाने दारू पिऊन शिक्षकांच्या पेश्याला तडा लावला आहे. यामुळे या शिक्षकाची चर्चा सुरु आहे. शाळेतील शिक्षक (Drunk ZP Teacher Viral Video) चक्क वर्गात दारु पिऊन झोपलाय. यामुळे विद्यार्थी देखील मस्ती करत आहेत.

Updated on 20 August, 2022 2:17 PM IST

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील धारणी तालुक्यातील एका छोटाशा गावातील झेडपी शिक्षकाने दारू पिऊन शिक्षकांच्या पेश्याला तडा लावला आहे. यामुळे या शिक्षकाची चर्चा सुरु आहे. शाळेतील शिक्षक (Drunk ZP Teacher Viral Video) चक्क वर्गात दारु पिऊन झोपलाय. यामुळे विद्यार्थी देखील मस्ती करत आहेत.

हे सगळं एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं असून आता संपूर्ण राज्यात या शिक्षिकाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. दारु पिऊन शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोरच झोपी गेलेल्या या शिक्षकावर कारवाई करण्याचीही मागणी केली जातेय. त्याचे पाय टेबलावर आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या शिक्षिकाला कशाचच भान नाहीये. वर्गातील विद्यार्थीही वर्गाबाहेर गेलेत.

वर्गातले सरच दारु पिऊन आल्यामुळे विद्यार्थीही गोंधळून गेलेत. या शिक्षिकाने चक्क जीन्समध्येच लघुशंकाही केलेली असते. या गुरुजींचं नाव पृथ्वीराज चव्हाण असं आहे. ते धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आता चौकशीत या शिक्षकावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

65 हजार पगार असणाऱ्या RTO अधिकाऱ्याची संपत्ती बघून डोळे होतील पांढरे, 6 घरे, सिनेमा हॉल, रोख रक्कम, सोनं..

दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत शाळेत येण्याची हिंमत या शिक्षकाची कशी झाली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांनाच आता शिस्त लावण्याची गरज असल्याची गरज या घटनेमुळे व्यक्त केली जातेय. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat) शिक्षण व्यवस्थेची किती दयनीय अवस्था आहे, हे अधोरेखित करणारी ही घटना आहे.

काय करायचे या भरमसाठ फी घेणाऱ्या खाजगी शाळेचे? फी न भरल्यामुळे शिक्षकाची विद्यार्थाला जबर मारहाण, विद्यार्थ्याचा मृत्यू..

विद्यार्थ्यांनाही याबाबत विचारणा केली जाते. सकाळी सर दारु पिउनच आले होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे या शिक्षकावर कारवाईची मागणी केली जात आहे. यामुळे मुलांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
असेही इंजिनिअर आपल्याकडे आहेत बरं का! रस्ता बांधायचा होता, झाला स्विमिंग पूल, रेल्वेचा कारभार
आता महाराष्ट्राला वीज खरेदी करता येणार नाही!! 5000 कोटी थकवल्याने कारवाई
आता कोणाकडे न्याय मागायचा? सरेंडर होण्यास सांगितलेला मंत्रीच बिहारमध्ये बनला कायदामंत्री

English Summary: Guruji like this? Drunk, came class, feet table jeans... ; Hero of ZP teacher..
Published on: 20 August 2022, 02:17 IST