Education

मित्रांनो दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यात दहावी बारावी आणि एएनएम धारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी या ठिकाणी 10वी, 12वी आणि ANM धारकांना नोकरी करण्याची संधी आहे. या ठिकाणी सहायक शिक्षिका, दाई, महिला वॉर्ड सेविका या पदाच्या एकूण चार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Updated on 13 March, 2022 11:13 AM IST

मित्रांनो दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यात दहावी बारावी आणि एएनएम धारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी या ठिकाणी 10वी, 12वी आणि ANM धारकांना नोकरी करण्याची संधी आहे. या ठिकाणी सहायक शिक्षिका, दाई, महिला वॉर्ड सेविका या पदाच्या एकूण चार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठी बोर्ड कडून अर्ज देखील मागविले जात आहेत. मित्रांनो जर आपण देखील या पदासाठी पात्र असाल तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.  या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल ठेवली गेली आहे. इच्छुक उमेदवारांना 11 एप्रिल च्या अगोदर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

हेही वाचा:- नौकरीने मारलं पण काळ्या आईने तारलं! बेरोजगार झालेला युवक आता शेतीतून प्राप्त करतोय लाखोंची कमाई

यासारखीच नौकरीची जाहिरात:- आनंदाची बातमी! 10 वी पास व आयटीआय उमेदवारांना MSEB मध्ये नोकरीची संधी; जाणुन घ्या याविषयी

नोकरी विषयी अधिक माहिती

पदे:- सहाय्यक शिक्षिका, दाई, महिला वॉर्ड सेविका

किती आहे पदसंख्या:- एकूण 4 पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक अहर्ता:- 10वी पास, 12वी पास/ANM (शैक्षणिक अहर्ता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात बघणे अनिवार्य राहणार आहे.)

वय:- कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त तीस वर्ष

नोकरीची जागा:- नागपूर जिल्ह्यातील कामठी या ठिकाणी

नोकरीसाठी अर्ज करण्याची पद्धत:- या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:- कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस,बंगला नंबर 40, टेम्पल रोड, नागपूर- 441001

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख:- सदर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून 12 मार्च 2022 पासून अर्ज मागविले गेले आहेत तसेच यासाठी 11 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागवले जाणार आहेत.

ऑफिसिअल वेबसाईट:- https://kamptee.cantt.gov.in/

पदांसाठी अधिकृत जाहिरात:- जाहिरात

माहिती स्रोत:- लोकशाही

English Summary: great news in nagpur district 10th and 12th pass candidate required learn more about it
Published on: 13 March 2022, 11:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)