Education

सध्या महाराष्ट्रात पदवीच्या शिक्षणात मोठे बदल होत आहेत. आता येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्व पदवी (UG) अभ्यासक्रमांचा कार्यकाळ चार वर्षांचा होणार आहे. यामुळे हा एक मोठा बदल आहे.

Updated on 09 December, 2022 6:16 PM IST

सध्या महाराष्ट्रात पदवीच्या शिक्षणात मोठे बदल होत आहेत. आता येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्व पदवी (UG) अभ्यासक्रमांचा कार्यकाळ चार वर्षांचा होणार आहे. यामुळे हा एक मोठा बदल आहे.

राज्यातले पुढचे शैक्षणिक वर्ष जून 2023 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधी सर्व विद्यापीठांना नियमावली तयार करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, देशात अनेक शिक्षण शाखांतली पदवी मिळवण्यासाठी तीन वर्षांचा शिक्षणक्रम असतो. त्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. 2020 मधल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) या शैक्षणिक रचनेत बदल होताना दिसत आहेत. यामध्ये अजून बदल अपेक्षित आहेत.

गुजरातमध्ये भाजपच नंबर वन! चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे मुख्यमंत्री? चर्चांना उधाण

दरम्यान, यामध्ये विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षानंतर या चार वर्षांच्या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याचा किंवा सोडण्याचा पर्याय मिळेल. म्हणजेच पदवीचं पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतर बाहेर पडल्यास विद्यार्थ्याला फक्त प्रमाणपत्र मिळणार आहे.

दोन वर्षांपूर्वी शरद पवारांचा शब्द आणि आज राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी 'या' नेत्याची वर्णी

तसेच दोन वर्षांनी बाहेर पडल्यास डिप्लोमा प्रमाणपत्र, तीन वर्षांनी बाहेर पडल्यास बॅचलर डिग्री आणि चार वर्षं पूर्ण केल्यानंतर ऑनर्स किंवा संशोधनाची बॅचलर डिग्री मिळेल, असे याचे स्वरूप आहे.

महत्वाच्या बातम्या;
25 वर्षांच्या तरुणाने करून दाखवलं! सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचे उत्पादन
वडगाव बारामतीत जनावरांचा बाजार सुरू, इतर ठिकाणी बंद, शेतकरी संघटना आक्रमक..
एकरी 140 टन उसाचे उत्पादन! कृष्णाच्या युवा शेतकऱ्याची कमाल

English Summary: Great news for students! Degree education state 4 years
Published on: 09 December 2022, 06:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)