सध्या रोजगाराच्या शोधात बरेच बेरोजगार तरुण वणवण भटकत असतात. खरे पाहायला गेले तर गेल्या दोन वर्षापासून खाजगी क्षेत्र असो वा सरकारी दोन्ही मध्ये भरती प्रक्रिया या बंद होत्या.परंतु आता या वेगवेगळ्या विभागांतर्गत सरकारी असो वा खाजगी क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया सुरू होत आहेत. आपल्याला माहित आहे कि ग्रामीण भागातील तरुण स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी व्यवसाय करता यावा या उद्देशातून किंवा चांगल्या कंपन्यांमध्ये पटकन नोकरी लागावी यासाठी आयटीआयचा मार्ग धरतात.
परंतु त्यांना देखील चांगली नोकरी मिळेल ही शक्यता जवळ जवळ धुसरच आहे. परंतु आता आयटीआय पास असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीची एकंदरीत अर्ज प्रक्रियेची माहिती
ज्या आयटीआय पास उमेदवारांना यामध्ये अर्ज करायचा असेल ते आज पासून अर्ज करू शकतात त्यासाठीचे अर्ज करण्याची शेवटची मुदत 12 सप्टेंबर 2022 आहे. विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करायचा असेल ते apprenticeship.gov.in अधिकृत संकेतस्थळावर करू शकता.
या ट्रेडसाठी आहे भरती
ही भरती ट्रेड ॲप्रेंटीसच्या 284 जागांसाठी घेतली जाणार असून यामध्ये वेल्डर,कारपेंटर,फिटर आणि पेंटर आदी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
लागणारी वयोमर्यादा
1- या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक असून…
3- ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची वयात सवलत आहे.
3-एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे.
या भरतीत कशी होईल निवड?
या पदांसाठी मेरीट लिस्टच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार असून ही मेरिट लिस्ट शैक्षणिक पात्रतेच्या बेसवर तयार केली जाणार आहे.
नक्की वाचा:Bussiness Idea: नासलेल्या दुधाचा असाही करा उपयोग, बनवा 'हे' दोन पदार्थ अन कमवा भरपूर नफा
Published on: 09 August 2022, 02:56 IST