बारावी पास व सैन्यात भरती होऊ इच्छीणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांना निमलष्करी दल अर्थात पॅरामिलिटरी फॉर्सेस मध्ये काम करण्याची उत्तुंग इच्छा असेल त्यांच्यासाठी ही बातमी विशेष आहे. CISF अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने हेड कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज मागवले आहेत.
मात्र, यासाठी CISF ने स्पोर्ट्स कोटाअंतर्गत येणाऱ्या मुलांनाच प्राधान्य दिले आहे. अर्थात जे उमेदवार स्पोर्ट्स कोट्यात येतात त्यांनाच यासाठी अर्ज करता येणार आहे. जे उमेदवार स्पोर्ट्स कोट्यातून येतात आणि ज्यांची बारावी कंप्लिट झाली आहे अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
CISF मध्ये काम करण्यासाठी इच्छुक आणि या पदासाठी पात्र उमेदवारांना https://www.cisf.gov.in/ या सीआयएसएफ च्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे. मित्रांनो मात्र ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी 31 मार्च 2022 च्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 249 पदे भरली जाणार आहेत. हे संपूर्ण 249 जागा हेडकॉन्स्टेबल अर्थात GD या पदासाठीच आहेत.
त्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अथवा शैक्षणिक संस्थेतून आपले 12 वीचे शिक्षण पूर्ण केले असेल तसेच स्पोर्ट्स कोटा मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं असेल त्यांनाच CISF मध्ये भरती केले जाणार आहे.
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्याचे वय 18 ते 23 वर्ष यादरम्यान असणे अपरिहार्य आहे. याच्यापेक्षा अधिक किंवा कमी वय असलेले उमेदवार या भरतीसाठी चालणार नाही. ज्या पात्र उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना यासाठी शंभर रुपये शुल्क म्हणून किंवा चलन स्वरूपात जमा करावा लागणार आहे.
मात्र ST कॅटेगिरी मध्ये येणाऱ्या उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आले आहे. या पदासाठी 25,500 ते 81,100 यादरम्यान वेतन प्राप्त होणार आहे. एकंदरीत ज्या उमेदवारांना पॅरामिलिटरी फोर्स मध्ये काम करण्याची इच्छा आहे तसेच जे उमेदवार स्पोर्ट्स कोट्यातून येतात त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया महत्त्वाची आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करावा.
संबंधित बातम्या:-
Job Alert: मुंबई मेट्रो मध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी! 2 लाख रुपये मिळणार पगार; वाचा याविषयी
Published on: 26 March 2022, 09:41 IST