सध्या केंद्रसरकार आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमातून भरत्या सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांनी या होऊ घातलेल्या विविध प्रकारच्या भरतीचा लाभ घ्यावा. संरक्षण क्षेत्रात देखील विविध प्रकारच्या पदांसाठी सध्या जाहिराती निघत असून तरुणांनी त्याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. अशाच एका भरती संबंधी या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
भारतीय तटरक्षक दलात 300 पदांसाठी भरती
भारतीय तटरक्षक दल अर्थात इंडियन कोस्ट गार्डने खलाशी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली असून जे उमेदवार यासाठी पात्र व इच्छुक असतील असे सर्व उमेदवारांनी इंडियन कोस्टगार्डच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
नक्की वाचा:PM Kisan: सावधान! उरले फक्त 2 दिवस; करा हे काम अन्यथा मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे
पदांची नावे
या भरती च्या माध्यमातून नाविक( घरगुती शाखा), नाविक (जनरल ड्युटी) आणी मेकॅनिकल( घरगुती शाखा) या पदांसाठी घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची तारीख
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते ऑनलाइन पद्धतीने 8 सप्टेंबर 2022 पासून अर्ज करू शकतात.
रिक्त जागांची डिटेल्स
1- खलाशी( सामान्य कर्तव्य)- 225 जागा
2- मेकॅनिकल- 16 जागा
3- मेकॅनिकल( इलेक्ट्रिक)- 10 जागा
4- मेकॅनिकल( इलेक्ट्रॉनिक्स)- 9 जागा
5- खलाशी( घरगुती शाखा)- चाळीस जागा
एकूण 300 पदांसाठी ही भरती होणार आहे.
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील ते आठ सप्टेंबर 2022 पासून अर्ज करण्यास सुरुवात करू शकतात आणि यासाठीचा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 सप्टेंबर आहे.
वयाची मर्यादा
या भरतीसाठी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय 18 ते जास्तीत जास्त बावीस वर्षे असावे.
लागणारी शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगळी असून यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही अधीसूचना वाचून माहिती मिळवू शकतात.
लागणारे शुल्क
ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना अर्ज शुल्क अडीचशे रुपये भरावे लागेल तर एसी, एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही.
निवड कशी केली जाईल?
या भरतीसाठी उमेदवारांना तीन टप्पे पार करावी लागलेली यातील पहिल्या टप्प्याची परीक्षा नोव्हेंबर 2022 आणि दुसऱ्या टप्प्याची परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होणार आहे.
अर्ज करण्यासाठी चे अधिकृत संकेतस्थळ
joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.
नक्की वाचा:आरोग्य विभागात भरती! आरोग्य विभागाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर 'या' तारखांना होईल परीक्षा
Published on: 28 August 2022, 05:53 IST