Education

हवामान खाते आणि शेतकरी यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. आपल्याला माहित आहेच की, हवामान खाते पावसाच्या संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवते व त्याचा फायदा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना होतो. अशा या महत्त्वाच्या हवामान खात्यामध्ये सध्या नोकरी करण्याची संधी चालून आली असून भारतीय हवामान विभागाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे व यासाठीची नोटिफिकेशन हवामान खात्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून या नोटिफिकेशनमध्ये या भरतीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या लेखात आपण या भरती विषयी थोडक्यात माहिती घेऊ.

Updated on 22 September, 2022 12:58 PM IST

 हवामान खाते आणि शेतकरी यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. आपल्याला माहित आहेच की, हवामान खाते पावसाच्या संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवते व त्याचा फायदा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना होतो. अशा या महत्त्वाच्या हवामान खात्यामध्ये सध्या नोकरी करण्याची संधी चालून आली असून

भारतीय हवामान विभागाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे व यासाठीची नोटिफिकेशन हवामान खात्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून या नोटिफिकेशनमध्ये या भरतीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या लेखात आपण या भरती विषयी थोडक्यात माहिती घेऊ.

नक्की वाचा:IMD Rain Alert: राज्यात पावसाचा जोर कमी! मात्र काही भागांत मुसळधार कोसळणार; यलो अलर्ट जारी

या पदांसाठी होणार आहे भरती

 भारतीय हवामान विभाग अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट-lll, प्रोजेक्ट सायंटिस्ट-ll,  प्रोजेक्ट सायंटिस्ट-l, सीनियर रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट इत्यादी पदाच्या रिक्त जागांसाठी आहे ही भरती होणार असून जवळजवळ 163 रिक्त पदे या माध्यमातून भरली जाणार आहेत.

 लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता

 यासाठी ज्या इच्छुक उमेदवारांना प्रोजेक्ट सायंटिस्ट या पदासाठी अर्ज करायचा असेल असे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेत तुन साठ टक्के गुणांसह एमएससी इन ॲग्रीकल्चर मेट्रोलॉजी किंवा एग्रीकल्चर फिजिक्स ची पदवी मिळवलेली असावी किंवा संबंधित उमेदवाराने बीई/बीटेक पूर्ण केलेली असावे.

त्यासोबतच रिसर्च असोसिएट या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल अशा उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पीएचडी किंवा एमएस्सी किंवा त्या समकक्ष एग्रीकल्चर मेट्रोलॉजी/एग्रीकल्चर फिजिक्स किंवा एग्रीकल्चर स्टॅटिस्टिक्स ची पदवी असणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:Relief Fund: 'या' जिल्ह्यातील नुकसान ग्रस्तांसाठी 48 लाखांचा निधी,वाचा या बाबतीत सविस्तर माहिती

 पदनिहाय वयोमर्यादा

 ज्या उमेदवारांना रिसर्च असोसिएट या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा उमेदवाराचे वय हे कमीत कमी 28 ते 35 वर्षे इतकी असेल म्हणजेच ही वयोमर्यादा संबंधित पोस्ट नुसार असेल.त्यासोबतच प्रोजेक्ट सायंटिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा पोस्ट नुसार 35 ते 45 वर्षे इतकी असेल.

 अर्जासोबत लागणारे कागदपत्रे

 जे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतील त्यांच्याकडे रिझूम, दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, लिव्हिंग सर्टिफिकेट, जे उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातील असतील अशांसाठी जातीचा दाखला, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे म्हणजे जे उमेदवार आरक्षित वर्गात असतील अशा उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादामध्ये जे काही सरकारी नियम आहेत त्यानुसार सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांची निवड होईल असे उमेदवार पुणे येथे हवामान खात्याअंतर्गत काम करतील.

 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

 ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल असे उमेदवार 9 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात कारण ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकच्या माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचावे.

नक्की वाचा:IMD Rain Alert: राज्यात पावसाचा जोर कमी! मात्र काही भागांत मुसळधार कोसळणार; यलो अलर्ट जारी

English Summary: golden apportunity to job in indian meteriological department
Published on: 22 September 2022, 12:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)