Education

अल्पसंख्यांक एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली असून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेच्या माध्यमातून आता एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Updated on 16 February, 2022 10:51 AM IST

अल्पसंख्यांक एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली असून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेच्या माध्यमातून आता एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

अल्पसंख्याक समाज असलेल्या जैन, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, शीख आणि पारशी तसेच ज्युया समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत एक शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाते. यामध्ये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि वित्त निगम, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या डॉ.एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत सध्या एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरीता पाच लाख रुपये कर्ज मर्यादा आहे.

परंतु आता या कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली असून आता एकाच कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना सात लाख 50 हजार रुपये कर्ज घेणे शक्य झाले आहे. एवढेच नाही तर राज्य शासनामार्फत राबवल्या जाणार्‍या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना मध्ये देखील वाढ करण्यात आली असून ते दोन लाख पन्नास हजार रुपयांऐवजी पाच लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार असून त्या माध्यमातून त्यांना शिक्षण घेणे सोपे होणार आहे असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

त्यासोबतच मौलाना आझाद महामंडळाच्या भांडवलातही राज्य शासनाने आता सातशे कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे.. त्यामुळे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे.

English Summary: get education loan to more than student in one family by alpsankhyank mahamandal
Published on: 16 February 2022, 10:51 IST