Education

शिक्षण क्षेत्रामध्ये जर एखाद्या उच्च अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल किंवा परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल तर पैशांची नितांत आवश्यकता भासते. अशावेळी जर तुम्ही कोणत्याही बँकेच्या अटी व शर्तींचे पालन करून सहज कर्ज घेऊ शकताकिंवा आपल्या देशातच मोठ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तरीसुद्धा सहज कर्ज मिळू शकते. शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे या विषयी सविस्तर माहिती घेऊ.

Updated on 23 November, 2021 5:19 PM IST

शिक्षण क्षेत्रामध्ये जर एखाद्या उच्च अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल किंवा परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल तर पैशांची नितांत आवश्यकता भासते. अशावेळी जर  तुम्ही कोणत्याही बँकेच्या अटी व शर्तींचे पालन करून सहज कर्ज घेऊ शकताकिंवा आपल्या देशातच मोठ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तरीसुद्धा सहज कर्ज मिळू शकते. शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे या विषयी सविस्तर माहिती घेऊ.

 भारतामध्ये शैक्षणिक कर्जाचे हे आहे चार प्रकार

  • करियर एज्युकेशन लोन- जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेऊनकरिअर करायचे असेल तेव्हा तो करिअर एज्युकेशन लोन घेऊ शकतो.
  • प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडन्ट लोन- प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यास सुरू ठेवण्यासाठी घेतले जाते.
  • पालक कर्ज-जेव्हा पालक आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतात,त्याला पालक कर्ज म्हणतात.
  • अंडर ग्रॅज्युएट लोन- शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, देशात आणि परदेशात पदवी मिळवण्यासाठी पदवीपूर्व कर्ज घेतले जाते.

शैक्षणिक कर्ज कशा पद्धतीने घ्यावी

  • सर्वप्रथम तुम्हाला बँक किंवा संस्था याची निवड करावी लागेल.
  • नंतर तुम्ही ज्या प्रकारचे कर्ज घेणार आहात त्याचे सर्व माहिती मिळवावी.
  • बँकेने तुम्हाला सांगितलेले व्याजदर नीट समजून घ्यावेत.
  • बँका आणि तुमची खात्री झाल्यावर करण्यासाठी अर्ज करावेत.

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा वयाचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सगळे आवश्यक मार्कशीट
  • बँकेचे पासबुक
  • अर्जदाराचा ॲड्रेस प्रूफ
  • अर्जदार करत असलेल्या अभ्यासक्रमाची डिटेल्स
  • विद्यार्थी आणि पालकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड
  • पालकांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक(संदर्भ-मीई शेतकरी)
English Summary: farmer son take education loan to use this process
Published on: 23 November 2021, 05:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)