दहावीनंतर असलेल्या तीन वर्षाच्या इंजीनियरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या म्हणजेच पॉलीटेक्निक साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करायच्या ऑनलाईन अर्जाला तंत्रशिक्षण संचालनालयाने 27 म्हणजे येत्या शुक्रवार पर्यंत मुदत वाढ दिली आहे.
राज्यात असलेल्या शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित तसेच खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या साठी प्रवेश प्रक्रिया 30 जून पासून राबविण्यात येते. परंतु आधीच या अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली गेली होती. आता ती मुदत वाढवून येत्या शुक्रवार पर्यंत म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत नोंदणी करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची सुविधा शुक्रवारपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या वेळापत्रकाचा तपशील
- प्रवेशप्रक्रियेसाठीविद्यार्थ्यांद्वारेसंकेतस्थळावर अर्ज छाननी योग्य पद्धतीने निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छाया पत्र अपलोड करणे – 27 ऑगस्ट
- प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे – 27 ऑगस्ट
- विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे – 30 ऑगस्ट
- सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्या मध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे.- 31 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर
- विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे – 4 सप्टेंबर
प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत वेबसाईट
Published on: 25 August 2021, 09:50 IST