Education

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2017-18,2018-19 या वर्षातील टंचाईग्रस्त,दुष्काळग्रस्त आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली असून जे विद्यार्थी या योजनेपासून वंचित असतील अशा विद्यार्थ्यांनी येत्या 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत माहिती सादर करून परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळवता येईल.

Updated on 31 January, 2022 6:58 PM IST

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2017-18,2018-19 या वर्षातील टंचाईग्रस्त,दुष्काळग्रस्त आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली असून जे विद्यार्थी या योजनेपासून वंचित असतील अशा विद्यार्थ्यांनी येत्या 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत माहिती सादर करून परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळवता येईल.

राज्यातील कोरणा चा प्रादुर्भाव विचारात घेऊन या योजनेच्या ऑनलाईन कार्यप्रणाली साठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील चार लाख 51 हजार 48 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव यासाठी दाखल झाले असून त्यामधील जवळजवळ दोन लाख 80 हजार 136 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळाली आहे.

जे विद्यार्थी या योजनेपासून अजूनही वंचित असतील अशा विद्यार्थ्यांना आता 28 फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष 2017 ते 19 पर्यंत च्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसपात्र असलेल्या आणि अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती न झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रतिपूर्ती करण्यासाठी दहावी व 

बारावीच्या विद्यार्थ्यांना http:feerefund-mh-ssc.ac.in या लिंक वर ऑनलाइन पद्धतीने माहिती सादर करावी लागेल.या लिंक साठी मंडळाच्या mahasscboard.inया अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

English Summary: examnition refund scheme limit extend till twenty eight february
Published on: 31 January 2022, 06:58 IST