शिक्षण क्षेत्र म्हटले म्हणजे समाजाचा आणि देशाचा भविष्यकाळ निश्चित करणारे क्षेत्र असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही देशाने जितके काम केले तितके कमीच आहे.कारण देशाची आणि समाजाची पुढची पिढी ही शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून घडत असते हेही तेवढेच खरे आहे.
परंतु आपल्या भारतातील एकंदरीत ग्रामीण भागातील विचार केला तर आजही बऱ्याच ठिकाणी शाळांची दुरवस्था पाहून खरंच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना वेगवेगळे विचार डोक्यात येतात.
नक्की वाचा:Education News: संपूर्ण देशात बोर्डाच्या परीक्षामध्ये येणार समानता,काय आहे सरकारचा प्लॅन?
केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून शिक्षण क्षेत्राच्या संबंधित निर्णय घेतले जातात. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी केंद्र सरकारने घेतला. तो म्हणजे केंद्र सरकारने 'पीएम श्री'या शिक्षण क्षेत्राशी संबंधित योजनेला मंजुरी दिली.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची घोषणा केली. नेमका केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतला? नेमकी ही योजना काय आहे?याबद्दल माहिती घेऊ.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित केंद्र सरकारचे मोठे निर्णय
1- केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयाच्या पीएम श्री योजनेला दिली मंजुरी.
2- या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील 14,500 शाळांचा संपूर्णपणे चेहरामोहरा बदलणार.
3- या योजनेच्या माध्यमातून काही नवीन शाळांची निर्मिती करण्यात येणार असून या शाळांना मॉडल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
4- या योजनेचा जो काही प्रोजेक्ट आहे हा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
5- तसेच या पीएम श्री योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील 14,500 जुन्या असलेल्या शाळांना अद्ययावत करण्यात येणार आहे.
तसेच या शाळांमध्ये नवीन टेक्नॉलॉजी, स्मार्ट क्लास तसेच क्रीडा आधुनिक संरचना यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
6- देशातील ज्या काही जुन्या शाळा आहेत त्यांची रचना अधिक सुंदर,मजबूत आणि आकर्षक बनवण्यात येईल.
7- प्रत्येक विभागामध्ये कमीत कमी एक पीएम श्री शाळा उभारण्यात येणार आहे.
8- तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळाही असेल व यामध्ये प्री प्रायमरी ते बारावीपर्यंत शिक्षण दिले जाईल व या शाळांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा देखील असेल.
नक्की वाचा:Job: सुवर्णसंधी! भारतीय तटरक्षक दलात आहे 'इतक्या' पदांसाठी भरती,संधीचे करा सोने
Published on: 08 September 2022, 01:21 IST