Education

आपला देश हा 70 टक्के शेतीवर अवलंबून आहे.अनेक उद्योगांसाठी शेतीतूनच कच्चामाल मिळतो.त्यामुळे शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कृषीविषयक शिक्षणाची आवश्यकता आहे. शेतकरी शिक्षित असेल तर जमिनीची योग्य काळजी घेऊन सुपीक जमिनीची उत्पादनक्षमता आणि पिकाची उत्पादनक्षमता ही चांगल्या प्रकारे वाढवूनशेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.देशाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे.कृषी शिक्षण आणि संशोधनाचा शेती उत्पादन वाढीत सिंहाचा वाटा आहे.या सगळ्या परिस्थितीमुळे कृषी शिक्षण काळानुरूप गरजेचे बनले आहे.या लेखात आपण दहावी व बारावीनंतर कोणकोणते कृषी विषयक अभ्यासक्रम घेऊ शकतो किंवा उपलब्ध आहेत ते पाहू.

Updated on 20 July, 2021 12:21 PM IST

 पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान बारावी विज्ञान उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनागुणानुक्रमे प्रवेश दिला जातो.बारावी मध्ये बायोलॉजी विषय असणे आवश्यक आहे. गणित विषय नसला तरी चालते. विद्यापीठांमध्ये  बीएससी( कृषी ),  बीएससी(( उद्यान),  बी टेक(( कृषी अभियांत्रिकी), बी टेक ( अन्‍नतंत्र),  बीएससी( कृषी जैवतंत्रज्ञान), बीबीए( कृषी ),  बीएससी( गृह विज्ञान ),  बीएससी ( वन) आणि बीएससी ( पशुसंवर्धन) हे पदवी अभ्यासक्रम आहेत.

 या अभ्यासक्रमाच्या सोई कुठे उपलब्ध आहे?

 भारतात 53 कृषी विद्यापीठे, पाच अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय कृषी विद्यापीठ व चार केंद्रीय विद्यापीठे आहेत. या सर्व विद्यापीठांमधून कृषी क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,  डॉ. पंजाबराव देशमुखकृषी विद्यापीठ अकोला,मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमाची सोय आहे. महात्माफुले कृषी विद्यापीठांतर्गत सात घटक महाविद्यालयातून बीएससी ( कृषी) पदवीसाठी कृषी महाविद्यालय पुणे, धुळे, कोल्हापूर, कराड आणि नंदुरबार या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

 या क्षेत्रात नोकरी आणि व्यवसाय विषयक कोणत्या संधी उपलब्ध आहेत?

  • कृषी पदवीधरांना कृषी विद्यापीठांतर्गत पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयात व्याख्याताम्हणून काम पाहता येते.
  • कृषी तंत्र निकेतन व कृषी तंत्र विद्यालय मध्ये शिक्षक या पदावर काम करू शकतात.
  • माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये व कृषिविषयक किमान कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पदावर काम करता येते.
  • कृषी विद्यापीठांतर्गतकृषी संशोधन शास्त्रज्ञ या पदावर संधी उपलब्ध आहेत.
  • कृषी पदवीधर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रांवर शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात.
  • राज्य शासनाच्या कृषी विभागात विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होते.
  • जिल्हा परिषद,पंचायत समिती आणिग्रामपंचायतीमध्ये ही विविध कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक या पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
  • राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी किंवा विकास अधिकारी या पदावर कृषी पदवीधरांचे नेमणूक होते.
  • खाजगी क्षेत्रात कृषी पदवीधरांना अनेक बियाणे, कीटकनाशके, खते, ठिबक आणि तुषार सिंचन कंपनी त्याच्या मध्ये काम करता येते
  • तसेच खाजगी क्षेत्रातील बँका,प्रक्रिया उद्योगतसेच कृषी सेवा सल्ला,विमा कंपन्यांमध्येकाम करता येते.
  • पदवीधरांना प्रसारमाध्यमांमध्ये आकाशवाणी, दूरदर्शन किंवा कृषी पत्रकारिता क्षेत्रातील करिअरच्या संधी आहेत.
English Summary: carrier opportunities in agriculture sector
Published on: 20 July 2021, 12:21 IST