Education

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यासारख्या अनेक योजना सुरु आहेत. या सगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये विविध तांत्रिक कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.

Updated on 25 August, 2021 12:52 PM IST

 केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यासारख्या अनेक योजना सुरु आहेत. या सगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये विविध तांत्रिक कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.

.बारावीनंत रसायन्स, वाणिज्य आणि कला तसेच एमसीवीसी या शाखेतील विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रातकुशल  बनवण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने या बी.वोकेशनल कोसला मान्यता दिली आहे. या कोर्सची रचना ही मनुष्यबळाची गरज घेऊन करण्यात आली आहे.या कोर्सेस मध्ये 40 टक्केथेरीव 60 टक्के प्रक्टिकल ट्रेनिंग देण्यात येते.

या कोर्समध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा,दुसरे वर्ष पूर्ण केल्यानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा तर तीन वर्ष पूर्ण केल्या तर बीहॉक पदवी विद्यार्थ्यांना मिळते.हे कोर्सेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ,पुणे विद्यापीठतसेच अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये उपलब्ध आहे.तसेच जे विद्यार्थी हा कोर्स पूर्ण करतात अशा विद्यार्थ्यांना प्रॅक्‍टिकल अनुभवासाठी स्टायपेंड मिळण्याची शक्यता असते.या कोर्सच्या पदवीनंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळतात तसेच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळते. शिवाय बी हॉक पदवीनंतर इतर कोणत्याही शाखेतील पदवीधर यांना उपलब्ध असणारे एमबीए पासून सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांत पर्यंत पर्याय उपलब्ध आहेत..

बी व्होक मधील उपलब्ध शाखा

 

 रिटेल मॅनेजमेंट,मॅन्युफॅक्चरिंग,रिन्युएबल एनर्जी,ग्राफिक डिझायनिंग व मल्टिमीडिया, रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग,सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तसेच मेकॅट्रॉनिक्‍स वगैरेशाखा उपलब्ध आहे.

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेस्वतः हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.यामध्ये तीन शाखा आहेत जसे की रिटेल मॅनेजमेंट,रिन्युएबल एनर्जी आणि मॅन्युफॅक्चरिंग.या शाखांमध्येबीव्होक कोर्सेस उपलब्ध आहे.रिटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी विद्यापीठाने मारुती सुझुकी या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे.

English Summary: carieer opportunityes in b vocational courses after twelve
Published on: 25 August 2021, 12:52 IST