भारत हा शेतीप्रधान देश आहे. जर आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये कृषी क्षेत्राला फार मोठा वाव आहे. जर आपण मागच्या कोरोना काळाचा विचार केला तर तेव्हापासून बऱ्याच नोकरदार, व्यवसायिक आणि सुशिक्षित तरुणांचा कल हा कृषी क्षेत्राकडे वाढताना दिसत आहे.
एक चांगली व्यावसायिक संधी म्हणून शेती व शेतीशी संबंधित व्यवसायाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. आपल्या अवतीभवती ची तसेच देशाची बाजारपेठेसह ग्राहकांच्या असलेल्या मानसिकतेचा जर अभ्यास करून योग्य व्यवसाय निवडला तर यश फार लांब असणार नाही.या लेखात आपण कृषी क्षेत्राशी संबंधित काही व्यवसायांची माहिती घेऊ.
कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय
- शेत मालाचे मार्केटिंग व निर्यात- शेतात पिकलेला शेता मालाचा पुरवठा करताना शेतकरी आणि ग्राहक यांच्या दरम्यान असलेले मध्यस्थ व्यक्ती हटवून जर मालाचा पुरवठा केला तरी 10 ते 15 टक्के फायदा होऊ शकतो. हा व्यवसाय एकट्या शेतकऱ्यांनी करण्यापेक्षा गावातील इतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वा गटामार्फत जर केला तर खूप फायदा होऊ शकतो. तसेच मालाची विक्री पद्धत व शेतमालाची पॅकेजिंग जा व्यवस्थित केली तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या बहुराष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल वरून देखील विक्री करणे शक्य आहे.
- कृषी संलग्न व्यवसाय- जर आपण कृषी क्षेत्राशी संलग्न व्यवसायांचा विचार केला तर फार मोठी यादी तयार होते. यामध्ये सेंद्रिय कंपोस्ट तयार करणे जैविक खते, रोपवाटिका, शेतमाल पॅकिंग सामग्री, ठिबक सिंचन सुविधा, शेतात लागणारे विविध प्रकारचे यंत्र व त्यांची दुरुस्ती संबंधीचे सेवा, शेडनेट, ग्रीनहाऊस, मल्चिंग पेपर, कोल्ड स्टोरेज,रायपनिंग चेंबर, पॅकिंग व ग्रेडिंग युनिट,पेस्ट कंट्रोल, सौर यंत्रणा, साठवण गृहे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे,निर्यात सुविधा केंद्र,विविध प्रकारचे प्रकल्प अहवाल, कृषी सल्ला सेवा,याबरोबरच माती,पाणी,विषाणू, पौष्टिकता अशा विविध प्रकारच्या तपासणी प्रयोगशाळा, विविध प्रकारच्या बाजार अभ्यास अहवाल निर्मिती इत्यादींचा समावेश यामध्ये करता येईल.
- प्रक्रिया उद्योग- कुठल्याही वस्तू वर प्रक्रिया करूनत्याची विक्री व्यवस्थापन करणे हे उत्पन्नवाढीचे फार मोठे साधन आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण आणि तरुणी ज्वारी,मका, सेंद्रिय डाळी अशा वेगळ्या प्रकारचे उद्योग उभे करून यशस्वीपणे वाटचाल करत आहे.
- शेतीच्या ठिकाणी जरी प्राथमिक प्रक्रिया केली तरी उत्पादनात 10 ते 20 टक्के वाढ होत आहे. सर्वप्रथम यामध्ये प्राथमिक आणि नंतर मोठ्या प्रक्रियेकडे वळावे. आपल्या ग्रामीण भागांमध्ये प्रक्रिया साठी खूप मागे आहोत. नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करताना सर्व प्रमाणपत्रे पॅकेजिंग आणि ब्रँडिंग च्या अनुषंगाने काम करायची गरज आहे.
- सल्ला सेवा- यामध्ये शेती व संलग्न व्यवसायातील नवीन लोकांना व्यावसायिक तत्त्वावर सल्ला, सेवा, मार्गदर्शन देण्याच्या विविध संधी आहेत. त्या भांडवलदार शेतकऱ्यांना त्यांची शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी चांगल्या व्यवस्थापकांची गरज असते. त्यांना उत्पादनापासून तर मालाच्या विक्री पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवून देणाऱ्या व्यक्तीची गरज असते. त्यासाठी ते चांगली किंमत मोजायला देखील तयार असतात.अशा पद्धतीने आपण अनेक प्रकारचा सल्ला सेवा मार्फत देखील चांगला व्यवसाय स्थापन करू शकतो.
Published on: 18 November 2021, 08:29 IST