Education

अनेक तरुण आणि तरुणी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि जिल्हा परिषद वगैरे परीक्षांची तयारी करत असतात. परंतु मागील बऱ्याच दिवसापासून सगळ्याच प्रकारच्या भरत्या बंद होत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने विविध प्रकारच्या शासकीय विभागांच्या भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू असून त्या संबंधीच्या जाहिराती देखील निघत आहेत. या विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करण्यामध्ये बँकेच्या परीक्षेची तयारी देखील खूपच मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी करत असतात.

Updated on 08 September, 2022 6:37 PM IST

 अनेक तरुण आणि तरुणी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि जिल्हा परिषद वगैरे परीक्षांची तयारी करत असतात. परंतु मागील बऱ्याच दिवसापासून सगळ्याच प्रकारच्या भरत्या बंद होत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने विविध प्रकारच्या शासकीय विभागांच्या भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू असून त्या संबंधीच्या जाहिराती देखील निघत आहेत. या विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करण्यामध्ये बँकेच्या परीक्षेची तयारी देखील खूपच मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी करत असतात.

नक्की वाचा:Education News: संपूर्ण देशात बोर्डाच्या परीक्षामध्ये येणार समानता,काय आहे सरकारचा प्लॅन?

अशा बँकेच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी असून ती म्हणजे  भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क अर्थात लिपिक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून भरती प्रक्रियेतून लिपिक संवर्गातील जूनियर असोसिएट या पदासाठी पाच हजार पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत.

यासंबंधीची अधिसूचना स्टेट बँकेने जारी केली असून या अधिसूचनेनुसार लिपिक पदासाठी एकूण 5008 रिक्त जागा आहेत. ही भरती देशातील विविध शहरांमध्ये जसे की मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, बेंगलोर, भोपाल, दिल्ली, चंदिगड,

चेन्नई, जयपुर, हैदराबाद, केरळ इत्यादी बऱ्याच शहरांमध्ये लिपिक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्रासाठी चांगली बातमी म्हणजे या भरतीसाठीचे सर्वाधिक पदे महाराष्ट्रात रिक्त आहेत.

नक्की वाचा:मोठी बातमी: राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती; या विभागात 78000 पदे भरणार

 या भरतीचे महत्वाचे दिनांक

1- अर्ज करण्याची तारीख- एसबीआय लिपिक या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते कालपासून म्हणजे 7 सप्टेंबर 2022 पासून करू शकतात.

2- अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2022 आहे.

3- या भरतीची परीक्षा ही नोव्हेंबर 2022 मध्ये होणार असून या भरतीचे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र 29 ऑक्टोबर 2022 रोजी प्राप्त होणार आहे. या पदांसाठीची मुख्य परीक्षा डिसेंबर 2022 पर्यंत होऊ शकते.

 लागणारी शैक्षणिक पात्रता

 या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल असे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक असून 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी उत्तीर्ण झालेले असावेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे विद्यार्थी लास्ट इयर मध्ये किंवा सेमिस्टर मध्ये आहेत त्यांना देखील अर्ज करण्याची मुभा आहे.

परंतु जर अशा उमेदवारांची निवड झाली तर त्यांना 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

 या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा

 या भरतीसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 28 वर्षे असणे गरजेचे आहे. जे उमेदवार राखीव प्रवर्गातील असतील अशा उमेदवारांना शासकीय नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.

नक्की वाचा:आरोग्य विभागात भरती! आरोग्य विभागाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर 'या' तारखांना होईल परीक्षा

English Summary: big recruitment in state bank of india for post of a clerk in india
Published on: 08 September 2022, 06:37 IST