Education

कोरोना काळापासून राज्यांमध्ये सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया बंद करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता सर्व काही पूर्ववत झाल्यामुळे शासनाच्या विविध विभागांतर्गत भरतीच्या जाहिराती आता मोठ्या प्रमाणावर निघू लागले आहेत. त्यामुळे विविध परीक्षांचे तयारी आणि नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांसाठी नोकरीच्या खूप चांगल्या संधी चालून येत आहेत.

Updated on 21 October, 2022 7:21 PM IST

कोरोना काळापासून राज्यांमध्ये सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया बंद करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता सर्व काही पूर्ववत झाल्यामुळे शासनाच्या विविध विभागांतर्गत भरतीच्या जाहिराती आता मोठ्या प्रमाणावर निघू लागले आहेत. त्यामुळे विविध परीक्षांचे तयारी आणि नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांसाठी नोकरीच्या खूप चांगल्या संधी चालून येत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागात लवकरच दहा हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली व या भरतीची जाहिरात येत्या 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2023 दरम्यान येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा:मोठी बातमी! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची दिवाळी भेट,ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळणार 'या' तारखेला

 काय म्हणाले ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन?

याबाबत त्यांनी म्हटले की,मार्च 2018 मध्ये आरोग्य विभागात तेरा हजार जागांची भरती निघाली होती परंतु मधल्या कालावधीत या भरती कडे दुर्लक्ष झाले व आता आम्ही दहा हजार 127 जागा या भरतीच्या माध्यमातून भरणार आहोत व त्यासाठीचे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले आहे.

नक्की वाचा:​​Jobs 2022: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! आजच UPSC च्या या भरतीसाठी करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर...

कसे आहे या भरतीचे वेळापत्रक?

 या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान घेण्यात येणार असून 27 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत आम्ही सर्व जागा भरून नियुक्ती पत्र देणार असल्याचे देखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. पुढे त्यांनी या भरतीच्या वेळापत्रक याबद्दल सांगितले की, 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल व त्यानंतर महिनाभराच्या कालावधीत या संबंधीच्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील.

त्यानंतर 25 जानेवारी ते 30 जानेवारी याकाळामध्ये प्राप्त अर्जांची छाननी होईल. नंतर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत असे देखील त्यांनी म्हटले. तसेच या भरतीची परीक्षा ही 25 ते 26 मार्च दरम्यान होईल. आणि या परीक्षेचा निकाल 27 मार्च ते 27 एप्रिल या दरम्यान जाहीर करून उमेदवारांना नियुक्ती देखील देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा:Education News: खुशखबर! आता 'या' विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये स्कॉलरशिप, वाचा डिटेल्स

English Summary: big recruitment in maharashtra health department in wiil be coming few days
Published on: 21 October 2022, 07:21 IST