जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागातील तरुण कायमच संरक्षण दलातील विविध खात्यांच्या भरतीसाठी नेहमी तयारी करत असतात. कोरोना कालावधीपासून संरक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रिया असो की इतर विभागातील भरत्या या सगळ्या थांबवण्यात आलेल्या होत्या. परंतु आता संरक्षण क्षेत्रातील असो व राज्य शासन यांच्या विविध विभागातील भरती प्रक्रियाच्या जाहिराती आता मोठ्या प्रमाणात निघत असून युवकांनी अशा भरतीचा लाभ घेण्याची ही वेळ आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संरक्षण दलातील विविध भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी असून ती म्हणजे आता बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स अर्थात बीएसएफ मध्ये हेडकॉन्स्टेबल( रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल( रेडिओ मेकॅनिक) या पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या लेखामध्ये आपण या भरती बद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Job: 'नाबार्डमध्ये'पदवीधरांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी, वाचा सविस्तर माहिती
बीएसएफमध्ये भरती
1- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख- जे उमेदवार इच्छुक असतील अशा उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून हे अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.
2- या भरतीत एकूण रिक्त पदे- ही भरती जवळ जवळ 1312 रिक्त पदांसाठी घेतली जाणार आहे.
3- लागणारी वयोमर्यादा- या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्यांची वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 25 वर्षांपर्यंत असावी.
4- या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
लागणारी शैक्षणिक पात्रता
1- हेडकॉन्स्टेबल( रेडिओ ऑपरेटर)- या पदासाठी इच्छुक उमेदवार हे दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआय किंवा बारावी(फिजिक्स,केमिस्ट्री, मॅथ म्हणजेच पीसीएम ग्रुप)60% उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या भरतीत निवड झाल्यास मिळणारी पगार
1- हेड कॉन्स्टेबल( रेडिओ ऑपरेटर)- या पदासाठी कमीत कमी 25 हजार पाचशे ते जास्तीत जास्त 81 हजार शंभर रुपये प्रतिमाह वेतन मिळेल.
2- हेडकॉन्स्टेबल( रेडिओ मेकॅनिक)- या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 25 हजार पाचशे ते एक हजार शंभर रुपये प्रतिमाह वेतन मिळेल.
या भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट
www.bsf.nic.in ही या भरतीसाठीचे अधिकृत वेबसाईट आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यावी.
Published on: 14 September 2022, 01:18 IST