Education

मुंबई : राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासक्रम आणि त्याची रचना यामध्ये बदल करण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न ठेवता त्यांचा मेंदू विकसित करण्यासाठी गृहपाठ बंद करण्यात येणार आहे. यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Updated on 26 December, 2022 9:38 AM IST

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 16 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर केले की इयत्ता 1 ते 4 वीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद केला जाईल. त्यानंतर अनेक संस्थांनी या अभ्यासक्रमासाठी शिक्षण विभागाकडे शिफारसी केल्या आहेत.

त्यांच्या शिफारशी विचारात घेतल्या जातील. यासोबतच राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

गृहपाठ बंद केल्यास, शिक्षक आणि शाळा चुकीचा अर्थ लावतील किंवा त्यातून पळवाटा काढतील अशी खबरदारी घेतली जाईल. शिक्षकांनी नवीन आणि चालू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना लवकर आणि योग्यरित्या समजेल अशा पद्धतीने शिकवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकवल्यास त्यांना गृहपाठाची गरज नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

आधार कार्डधारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी! आजच करा हे काम नाहीतर...

नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी आणि 'परख' संस्थेने केलेल्या शिफारशी, त्यांनी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला जाईल. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व निर्णय घेतले जातील, असे केसरकर म्हणाले.

नैसर्गिक शेती करणाऱ्यांना मिळणार अनुदान; सरकारचा मोठा निर्णय

English Summary: Big news: Students' homework stopped - Education Minister Deepak Kesarkar
Published on: 26 December 2022, 09:38 IST