तरुणांना भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवेची प्रचंड प्रमाणात आवड असते. यामध्ये पाहिले तर ग्रामीण भागातील जवळजवळ 90 टक्के पेक्षा जास्त तरुण हे सैन्य भरतीची तयारी करत असतात.
परंतु कोरोना कालावधीपासून भारतीय सैन्यात कुठल्याही प्रकारची दहावी उत्तीर्ण पदांसाठी भरती निघाली नाहीये. आता परिस्थिती नॉर्मल होत असतानाबऱ्याच प्रकारच्या नोकऱ्यांच्या जाहिराती निघत आहेत. अशातच भारतीय सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या व दहावी पास असाल तर अशांसाठी एक सुवर्ण संधी म्हणावी अशीच बातमी आहे. भारतीय सैन्यदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली. या भरती प्रक्रियेची माहिती या लेखात आपण घेऊ.
दहावी पास तरुणांसाठी भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी
भारतीय सैन्यदलामध्ये दहावी पास भरती प्रक्रिया राबवली जाणार असून ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असतो असे उमेदवार इंडियन आर्मीच्या indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. याच संकेतस्थळावर उमेदवारांना या भरती संबंधी ची अधिसूचना तपशीलवार पाहायला मिळेल.
या भरतीत भरली जाणारी पदे आणि पदनिहाय संख्या
1-कूक - नऊ पदे
2- शिंपी - एक पद
3- नाभिक- एक पद
4- - रेंज चौकीदार - एक पद
5- सफाईवाला- दोन पदे
पदनिहाय शैक्षणिक पात्रता
कूक पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा तसेच भारतीय स्वयंपाकात त्यांचे प्राविण्य असावे व त्यासोबत शिंपी पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि शासन मान्यताप्राप्त संस्थेचेया क्षेत्रातील आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:स्मार्टफोन ठरेल व्यवसायवृद्धीसाठी एक टर्निंग पॉइंट, जाणून घेऊ कसे?
या भरती साठी वयोमर्यादा
भारतीय लष्कराच्या अधिसूचनेनुसार ज्या कोणी उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असेल अशा उमेदवारांचे वय…
1- अनारक्षित श्रेणीसाठी- 18 ते 25 वर्ष असणे गरजेचे आहे.
2- ओबीसी प्रवर्गासाठी- 18 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
3- एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी- 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
महत्वाची माहिती- ज्या उमेदवारांना या भरती संबंधी चे आधी सूचना पाहायचे असेल असे उमेदवार indianarmy.nic.in या भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकतात.
Published on: 21 March 2022, 03:51 IST