Education

कोरोना काळापासून सरकारकडून वेगवेगळ्या क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. परंतु आता सगळी परिस्थिती नॉर्मल होत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात भरती प्रक्रिया राबवण्यास सरकारनेसुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण क्षेत्रातील नोकरीचे स्वप्न पाहणारे तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Updated on 19 December, 2021 9:47 AM IST

 कोरोना काळापासून सरकारकडून वेगवेगळ्या क्षेत्रातील  भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. परंतु आता सगळी परिस्थिती नॉर्मल होत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात भरती प्रक्रिया राबवण्यास सरकारनेसुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण क्षेत्रातील नोकरीचे स्वप्न पाहणारे तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

त्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाने नाविक जीडी सह अनेक  पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार ही भरती एकूण 322 पदांसाठी घेतली जाणार असून यापैकी 260 पदे नाविक-जनरल ड्युटी, 35 पदे ही सेलर डीबी आणि 27 पदे हे मेकॅनिकल चे आहेत. परंतु अजून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

 सरकारने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 4 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार आहे आणि 14 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. या पदासाठी उमेदवारांना अर्ज करायचे असतील ते अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज करू शकतात.

 या भरतीसाठी आवश्यक पात्रता

  • सेलर जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून इंटरमिजिएट उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच त्यांच्याकडे इंटरमिजिएट मध्ये भौतिकशास्त्, गणित हे विषय असणे आवश्यक आहे. तसेच दहावी उत्तीर्ण उमेदवार देखील नाविक पदासाठी अर्ज करू शकतात.
  • मेकॅनिकल पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दहावी पास असलेल्या डिप्लोमा धारक असणे अनिवार्य आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 22 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना हि नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

 पगार किती मिळेल?

  • या उमेदवारांची नाविक जीडी आणि नाविक डीबी पदांवर निवड केली असेल त्यांना वेतन स्तरतीन अंतर्गत मूळ वेतन म्हणून 21 हजार 700 रुपये मिळतील.
  • मेकॅनिकल पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर पाच अंतर्गत मूळ वेतन हे 29 हजार 200 रुपये मिळेल शिवाय त्याव्यतिरिक्त त्यांना यांत्रिक वेतन म्हणून सहा हजार दोनशे रुपये स्वतंत्रपणे मिळतील.
  • शिवाय या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार अनेक प्रकारच्या भत्याचालाभ मिळेल.
English Summary: big employment oppurtunity in coastguard online process start from 4 january to 14 january 2022
Published on: 19 December 2021, 09:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)