महाराष्ट्र शासनाने कोरोना नंतर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विभागात रिक्त जागांच्या भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागात कंत्राटी पद्धतीने एकच वेतनावर 195 रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या 195 पदांमध्ये विविध प्रकारचे पद आहेत.
पदाचे नाव आणि संख्या
1- जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- दहा पदे
2- संरक्षण अधिकारी- 20 पदे
3- कायदेशीर सह परिविक्षा अधिकारी- 21 पदे
4- समुपदेशक- पंधरा पदे
5- सामाजिक कार्यकर्ता- 23 पदे
6- लेखापाल- अठरा पदे
7- डेटा विश्लेषक- 13 पदे
8- सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर- 50 पदे
9- आऊटरीच वर्कर- 25 पदे
एकूण रिक्त पदे - 195
लागणारी शैक्षणिक पात्रता
1- जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- या भरतीसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी या पदासाठी पदव्युत्तर शिक्षण असणे गरजेचे आहे व तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
नक्की वाचा:मोठी बातमी! MSP समितीच्या बैठकीची तारीख ठरली; शेतकऱ्यांसाठी होणार मोठा निर्णय
2- संरक्षण अधिकारी- यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक
3- परिविक्षा अधिकारी- या पदासाठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांचे विधी शाखेत शिक्षण होणे गरजेचे आहे.
4- समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता आणि लेखापाल- या पदासाठी उमेदवार हा पदवीधर आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
5- डेटा विश्लेषक- या पदासाठी सांख्यिकी शास्त्रातील पदवी असणे गरजेचे आहे.
6- आऊटरीच वर्कर आणि सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर- या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण आणि उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा
कमीत कमी 18 ते 43 वर्ष वयोगटातील अहर्ता प्राप्त उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 ऑगस्ट 2022 असून रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट
www.wcdcommpune.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
नक्की वाचा:Ration Card: आता 'या' योजनेअंतर्गत रेशन कार्ड सहज होणार उपलब्ध; जाणून घ्या प्रक्रिया
Published on: 17 August 2022, 11:27 IST