Education

राज्यातील कोरोनाची उद्भवलेली गंभीर परिस्थिती पाहता शैक्षणिक वर्ष 2021- 22 या वर्षाची शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये इंजीनियरिंग साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात सोळा हजार दोनशे पन्नास रुपयांची म्हणजेच अंदाजे 25 टक्केी सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

Updated on 26 June, 2021 8:21 PM IST

 राज्यातील कोरोनाची उद्भवलेली  गंभीर परिस्थिती पाहता शैक्षणिक वर्ष 2021- 22 या वर्षाची शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये इंजीनियरिंग साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात सोळा हजार दोनशे पन्नास रुपयांची म्हणजेच अंदाजे 25 टक्‍के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

 उदय सामंत यांनी माटुंगा येथील वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मधील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात राज्यातील विविध शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संस्थांचा आढावा घेतला या घेतलेल्या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी.. गुप्ता, तंत्रशिक्षण संचालक  डॉ. अभय वाघव संबंधित महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

.यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थे मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ट्युशन्स शुल्का शिवाय इतर शुल्क भरावे लागते. त्यामध्ये कोरोना काळात विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये उपस्थित नसल्याने ग्रंथालय, जिमखानाइत्यादी प्रकारच्या शैक्षणिक सुविधांचा वापर केला जात नाही.. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून या सुविधांवरील शुल्क घेऊ नये. 

कोरोना या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी,  म्हणून इतर शुल्का मधील सोळा हजार 250रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. या निर्णयाचा फायदाराज्यातील सुमारे 20 हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना होणार आहे..

English Summary: allowance in fees of enginering
Published on: 26 June 2021, 08:21 IST