Education

कृषी महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर रविवार दिनांक 17 रोजी पहिल्या कॅप राऊंडनंतरची फेरीची वाटप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. महाराष्ट्र मध्ये असलेल्या चारही कृषी विद्यापीठातील संलग्न असलेल्या सगळ्या महाविद्यालयातील प्रवेश या प्रक्रियेमार्फत होणार आहेत.

Updated on 16 January, 2021 5:03 PM IST

कृषी महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर रविवार दिनांक 17 रोजी पहिल्या कॅप राऊंडनंतरची फेरीची वाटप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्र मध्ये असलेल्या चारही कृषी विद्यापीठातील संलग्न असलेल्या सगळ्या महाविद्यालयातील प्रवेश या प्रक्रियेमार्फत होणार आहेत.मागच्या महिन्यातल्या 9 डिसेंबरपासून कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी चा अंतिम दिनांक 31 डिसेंबर होता. ऑनलाईन स्वरूपामध्ये ज्या तक्रारी उपलब्ध झाल्या होत्या त्यांची यादी 13 जानेवारीला प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट 15 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यासाठीचे असलेली पहिल्या प्रवेश फेरीची वाटप यादी ही 17 जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे.  

त्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी 18 व 19 जानेवारीपर्यंत तर दुसर्या प्रवेश फेरीची वाटप यादी ही 23 जानेवारीला प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवेश निश्चिती ची शेवटची मुदत ही 24 व 25 जानेवारी असेल. त्यानंतर तिसर्‍या फेरी ची वाटप यादी 28 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.

English Summary: Allotment of seats tomorrow for admission diploma in agriculture college
Published on: 16 January 2021, 05:03 IST