Education

कृषीमधील पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘सामाईक प्रवेश परीक्षा २०२२’ ही ११ ते १३ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना २८ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाने दिली आहे.

Updated on 05 March, 2022 10:29 AM IST

राज्यात ही परीक्षा १७ केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदवीधर आणि २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र राहणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या नमुन्यातील ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ‘http://www.mcaer.org’ संकेतस्थळावर भरायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचणे गरजेचे असल्याचे परीक्षा मंडळातर्फे सांगण्यात आले.

या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्ज महाराष्ट्र कृषी विद्यापीठे मंडळ यांच्याकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. अंतिम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना आपले परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावरून ३ जूनपासून प्रिंट काढून घेता येणार आहे. परीक्षेतील उत्तराची नमुना पत्रिका २० जूनला उपलब्ध होईल. तर परीक्षेचा निकाल २७ जून रोजी संबंधित संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी स्पष्ट केले आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ‘सामाईक प्रवेश परीक्षा-२०२२’बाबत माहिती -

तपशील : कालावधी

- ऑनलाइन अर्ज भरणे : २८ मार्चपर्यत

- ऑनलाइन परीक्षा शुल्क भरणे : ३१ मार्चपर्यत (दुपारी १२ वाजेपर्यंत)

- परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होणे : ३ जूनपासून

- परीक्षा अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : http://www.mcaer.org

English Summary: Agriculture University : Examination for admission to post graduate course will be held from 11th to 13th June
Published on: 05 March 2022, 10:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)