यावर्षी कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया चौथी फेरी महाविद्यालयीन स्तरावर पार पडल्यानंतर यंदाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण सत्र एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. प्रत्येकी 20 आठवड्यांच्या दोन सत्रात येत्या डिसेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे.
येणाऱ्या काळात नवीन कृषी शिक्षण धोरणाची आखणी साठी तसेच यापुढे उच्च शिक्षण प्रवेशाच्या पात्रतेसाठी सामायिक प्रवेश परीक्षा सोबतच बारावीच्या परीक्षेचे मार्क्स प्रमाण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी.
या समितीने एक महिन्याच्या कालमर्यादेत 30 एप्रिल पर्यंत शासनाला त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज दिले. राज्यातील प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा संदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Published on: 23 March 2021, 02:21 IST