मागच्या वर्षापासून कोरोनाचे महासंकट असल्यामुळे गतवर्षाप्रमाणे याही वर्षी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना महामारी मुळे देशातील शाळा गेल्या वर्षापासून बंदच आहेत परंतु शिक्षण मात्र ऑनलाईन सुरू आहे. ऑनलाइन ऑनलाइन शिक्षणावर काही मर्यादा येत असल्याने गेल्या वर्षी देखील 25% अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती.
या क्षेत्राशी संबंधित घटकांशी सखोल विचारविनिमय केल्यानंतर आणि आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे यावर्षीचे शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
पुरणाचे दुसरी लाट आल्यामुळे याहीवर्षी शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थिती मुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात मार्च दोन हजार वीस पासून कोरोना चे संकट सुरू झाला आहे.
त्यामुळे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता पहिली ते नववी पर्यंत च्या वर्गाच्या वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर 2020 -21 या शैक्षणिक वर्षात ही शाळा सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदाच बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर विषय निहाय कमी करण्यात आलेल्या प्रकरणाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Published on: 24 July 2021, 12:04 IST