Education

राष्ट्रीय पात्रता- सह- प्रवेश परीक्षा(NEET) 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी बरेच विद्यार्थी करत होते. मात्र राष्ट्रीय चाचणी एजन्सीने शुक्रवारी स्पष्ट केले की, नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही.

Updated on 28 August, 2021 11:39 AM IST

 राष्ट्रीय पात्रता- सह- प्रवेश परीक्षा(NEET) 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी बरेच विद्यार्थी करत होते. मात्र राष्ट्रीय चाचणी एजन्सीने शुक्रवारी स्पष्ट केले की, नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही.

 ही परीक्षा नियोजनाप्रमाणे रविवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला होणार आहे. यावर बोलताना एनटीएचे डीजे विनीत जोशी म्हणाले की, सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांची निटचा संबंध येत नाही. त्यामुळे परीक्षा 12 सप्टेंबर रोजी ठरल्यानुसार आयोजित केली जाईल.नीट मध्ये प्रयत्न वाढविण्याबाबत एन टी ए अधिकारी म्हणाले की, नीट मध्ये अनेक प्रश्नांबाबत निर्णय आरोग्य मंत्रालय घेईल.

वैद्यकीय प्रवेशाचे प्रयत्न वाढविण्याची कोणतीही योजना नाही

 सी बी एस सी बोर्ड, कंपार्टमेंट परीक्षा व इतर प्रवेश परीक्षांमध्ये संघर्ष असल्याने नीट पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांचा एक वर्ग करत आहे. सीबीएससी बारावी च्या विद्यार्थ्यांचे सहा सप्टेंबर रोजी जीवशास्त्र परीक्षा, 9 सप्टेंबर रोजी फिजिक्स विषयाचे पेपर आहेत. नीट परीक्षेच्या एकाच आठवड्यात दोन प्रमुख विज्ञान पेपर असणार आहेत. 

त्यापूर्वी अधिवक्ता अनुभा श्रीवास्तव अध्यक्ष इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशन लॉयर आणि बाल हक्क कार्यकर्ते यांनी अध्यक्ष संयुक्त संचालक आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्री यांना पत्र लिहून परीक्षेच्या तारखांची वेळापत्रक पुन्हा ठरवण्याची आणि ती एक किंवा दहा दिवसांसाठी पुढे ढकलण्याची विनंती केली. जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यात अडचण येणार नाही.

English Summary: 12 september is a date of neet exam
Published on: 28 August 2021, 11:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)