सर्वांचे लक्ष लागलेल्या दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना याबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता लागली होती.
यंदाच्या वर्षी निकाल ९३.८३ लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे.
दरम्यान, यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत निकालाची घोषणा केली. यात मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशीलही जाहीर करण्यात आले.
ज्यादा दराने विक्री, बोगस खते विक्री करणे आले अंगलट, नगरमध्ये तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित..
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबासाईटवर आपले व्यक्तिगत निकाल पाहता येणार आहे. मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
अरबी समुद्रात मॉन्सून दाखल, लवकरच राज्यात दाखल होण्याची शक्यता..
यामध्ये राज्यात कोकण विभागातील ९८.११ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे. आता लवकरच 11 वी चे प्रवेश सुरू होतील.
काळ्या हळदीची लागवड आहे फायदेशीर, शेतकरी होईल मालामाल..
शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताना काळजी घ्या! कृषी विभागाकडून सव्वा कोटीचे बोगस बियाणे जप्त
अरबी समुद्रात मॉन्सून दाखल, लवकरच राज्यात दाखल होण्याची शक्यता..
Published on: 02 June 2023, 12:00 IST