महिंद्रा अँड महिंद्रा ही कार निर्मिती क्षेत्रातील एक महत्वाची कंपनी असून या कंपनीने वेगवेगळी मॉडेल्स कायमच बाजारात आणले आहेत. या पार्श्वभूमीवरच आता महिंद्राने लोकप्रिय एसयूव्ही बोलेरोचा एक नवीन अवतार समोर आणला असून ही नवीन बोलेरो मध्ये कंपनीने नवा लोगो दिला आहे.हा लोगो अगोदर महिंद्राच्या स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एन या मॉडेलवर देखील दिसला आहे. या एसयुवी नंतर कंपनीने सर्वाधिक विकल्या जाणार्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहन बोलेरो देखील अपडेट केले आहे.
. परंतु कंपनीने अजून पर्यंत देखील या बोलेरोच्या फिचर्सची अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु काही मिडीया रिपोर्टमध्ये या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगण्यात आले आहे.
काय आहेत या बोलेरोची वैशिष्ट्ये?
या नवीन बोलेरो मध्ये पुढील ग्रील मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही परंतु नवीन लोगो बसवण्यात आला आहे. त्यामुळे ही कार आतिशय आकर्षक दिसत आहे. तसेच या गाडीच्या पुढील, मागील आणि स्टेरिंगवर नवीन लोगो देण्यात आला आहे.
नवीन बोलेरो विषयी प्राप्त माहितीनुसार, या गाडीत 4 पावर विंडो, चार स्पीकर्ससह टू डीन म्युझिक सिस्टिम, मॅन्युअल डीमिंग आयआरव्हीएम, रियर वाशरसह वायफर, एमआयडीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशी वैशिष्ट्ये त्यामध्ये आहे. तसेच एबीएस, एबीडी आणि डुएल एअरबॅगसह सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली आहे.
नक्की वाचा:सेकंड हॅन्ड कार घेताय? एका रुपयात जाणून घ्या कारच्या टायरची स्थिती...
या नवीन बोलेरो हेडलाईट ब्लॅक हॅलोजनच्या आत बसवण्यात आले आहेत. त्याला डीआरएलसह टर्न इंडिकेटर देखील मिळतील. साईड प्रोफाईल मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. गाडीला मेटल बंपर देण्यात आला आहे. या गाडीला कंपनीने दीड लिटर तीन सिलेंडर टर्बो चार्ज केलेले एम हॉक 75 इंजिन दिले आहे. तसेच या कारमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स आहे.
किती असेल किंमत?
मिळालेल्या माहितीनुसार की नवीन बोलेरो बी 4, बी6( पर्यायी) ट्रीममध्ये येईल. या गाडीच्या एक्स शोरूम किमतीबद्दल बोलायचे झाले तर B6 ची किंमत नऊ लाख 99 हजार ते B6( पर्यायी) ची किंमत सुमारे दहा लाख 24 हजार रुपये असू शकते.
Published on: 31 August 2022, 02:16 IST